illegal meat trade goa Dainik Gomantak
गोवा

Beef Smuggling: गुढी पाडव्याच्या दिवशी मडगावात 300 किलो मांस जप्त; माशांसोबत गोमांसाची भेसळ

Margao Beef Seizure: या मांसात माशांची भेसळ केल्याचा आरोप बजरंग दलाने केला असून, या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे

Akshata Chhatre

मडगाव: कोकण रेल्वे पोलीस खात्याने मोठी कारवाई करत गुढीपाडव्याच्या दिवशी रविवारी (दि. ३१ मार्च) सुमारे ३०० किलो बेकायदेशीर आणि अस्वच्छ मांस जप्त केले आहे. या मांसात माशांची भेसळ केल्याचा आरोप बजरंग दलाने केला असून, या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

गुढी पाडव्याच्या दिवशी ३०० किलोचे मांस जप्त

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे पोलिसांनी गुढी पाडव्याच्या दिवशी तब्बल ३०० किलोचे मांस पकडले. बजरंग दलाने उघड केलेल्या माहितीनुसार या मांसासोबत माशांची देखील भेसळ आढळून आली आहे. हिंदू लोकं मासे खातात मात्र गोमांस कधीही खात नाही आणि जर का गाईच्या मांसासोबत अशाप्रकारे माशांची आयात होत असेल तर हा प्रकार वेळीच रोखला गेला पाहिजे अशी मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलीये. गेल्या काही दिवसांपासून गोवा पोलीस ठिकठिकाणाहून गोमांसाची होणारी तस्करी पकडण्यात यशस्वी होतायत, आणि याबद्दल बजरंगदलाने त्यांच्या कामाचे कौतुक केलेय, आणि यापुढे देखील पोलीस अशाचप्रकारे काम करतील असा विश्वास व्यक्त केलाय.

या गोमांसाची तस्करी करणारा माणूस नेमका कोण याचा ताबडतोब शोध घ्यावा अशी मागणी त्यांनी केलीये. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील लक्ष घालून प्रकरणातील सूत्रधाराला समोर आणावं अशी मागणी केली जातेय. गोव्यात मीट कॉम्प्लेक्स सुरु आहे आणि तरीही जर का काही जणांकडून बेकायदेशीरपणे मांसाची तस्करी केली जाणार असेल तर अशा माणसांना आम्ही सोडणार नाही, त्यांना व्यवस्थित त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था केली जाईल असा इशाराच बजरंग दलाने दिलाय.

मोल्यातील तस्करीवर पडदा?

गुढी पाडव्याच्या दिवशी केसरिया हिंदू वाहिनी गोवंश संरक्षण कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव झा आणि त्यांच्या पथकाने मोले तपासणी नाक्यावर उत्तर प्रदेश नोंदणीकृत कंटेनर ट्रक रोखला होता .या ट्रकमध्ये सुमारे ७ टन मांस भरलेले होते आणि हे मांस गोमांस असल्याचा संशय जीव झा यांनी व्यक्त केला. या घटनेनंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे या मांसाची कागदपत्रे तपासण्याची आणि ते गोमांस आहे का, याची चाचणी करण्याची मागणी केली मात्र त्यावर म्हणावी तशी कारवाई झालेली नाही. या सगळ्या प्रकरणात कोणी पोलीस अधिकारी तर सामील नाही ना याचा शोध लावू असे बजरंग दल म्हणाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "गोव्यात येऊन मला आनंद झाला" पी. अशोक गजपती राजू (राज्यपाल)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT