पणजी: गेल्या चार आठवड्यांपासून गोव्यातील गोमांस पुरवठ्याचा तुटवडा कायम आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे गोव्यातील गोमांसाची बाजारपेठ पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, आता तेलंगणामधील कत्तलखान्यांतून गोमांस आयात करून काही प्रमाणात ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कुरेशी मीट ट्रेडर्स असोसिएशनचे सरचिटणीस अन्वर बेपारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्याला दररोज २० टन गोमांसाची गरज असताना, सध्या फक्त ५ टन मांस आयात करता येतेय. त्यामुळे, हे मर्यादित मांस काही तासांतच संपून जातेय. अनेक दुकानांना दिवसाच्या उत्तरार्धात व्यवसाय बंद ठेवावा लागतोय. त्यामुळे, या पुरवठ्यावर व्यापाऱ्यांना तूर्तास समाधान मानावे लागत आहे.
बेपारी यांच्या मते, गोव्यातील गोमांसाचा मुख्य पुरवठा कर्नाटकमधून होतो. कर्नाटकातील काही पुरवठादारांनी सप्टेंबर महिन्यात संप मिटण्याची शक्यता वर्तवली आहे. तसे झाल्यास, गोव्यातील गोमांस व्यापार पूर्ववत होण्याची आशा आहे.
या संकटात ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. तेलंगणहून येणारे मांस ए.पी.ई.डी.ए. (APEDA) प्रमाणित आणि नोंदणीकृत कत्तलखान्यांमधून आले आहे की नाही, याची कसून तपासणी केली जात आहे. सर्व कागदपत्रे आणि मासाची गुणवत्ता तपासल्यानंतरच ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले जात आहे.
याव्यतिरिक्त, उसगाव येथील सरकारी गोमांस कॉम्प्लेक्स लिमिटेड (जीएमसीएल) निर्यात साठ्यातून अतिरिक्त गोमांस बाजारात उपलब्ध करून देत आहे. जीएमसीएलकडे सध्या १५ टन गोठवलेले मांस आहे, जे तात्पुरता पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वापरले जात आहे. जीएमसीएल हे मांस औरंगाबाद, महाराष्ट्रातून आयात करते. व्यापाऱ्यांचे जीवनमान आणि व्यवसाय सुरू राहावा यासाठी हे पाऊल उचलल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.