Beef Shortage in Goa Dainik Gomantak
गोवा

Beef Shortage in Goa: गोव्यात गोमांसाची कमतरता; वाढत्या निर्यातीमुळे किमतीत वाढ, ग्राहकांमध्ये निराशा

Goa Meat Market: गोमांसाच्या निर्यातीत अचानक वाढ झाल्यामुळे गोव्यात गोमांसाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे गोमांसाच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.

Sameer Amunekar

मडगाव: गेल्या काही वर्षांत पश्चिम आशिया, मध्य पूर्व, युरोप आणि आफ्रिकेतील निर्यातीत वाढ झाल्यामुळे गोव्यातील गोमांस स्थानिक बाजारपेठेत तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

निर्यातीत अचानक वाढ झाल्यामुळे गोव्यात गोमांसाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे गोमांसच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. किमती वाढल्यामुळे ग्राहक आणि रेस्टॉरंट मालकांमध्येही मोठ्या प्रमाणात निराशा निर्माण झाली आहे.

राज्यात पुन्हा एकदा निर्माण झालेल्या या टंचाईमुळे गोमांस पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे, ज्यामुळे साठ्याच्या कमतरतेमुळे अनेक मांस स्टॉल बंद करावे लागले आहेत. गोवा मीट कॉम्प्लेक्समध्ये गेल्या दोन दिवसांत कत्तलीसाठी एकही प्राणी आणण्यात आला नाही, ज्यामुळे समस्या आणखी वाढली आहे.

"निर्यातीचे प्रमाण पाहता स्थानिक पातळीवर कत्तलीसाठी कमी प्राणी उपलब्ध आहेत. कत्तलीसाठी अतिरिक्त जनावरे उपलब्ध करून देऊन ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच गोमांस पुरवठा पुन्हा सुरू होईल," असं आश्वासन ऑल गोवा बीफ ट्रेडर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शब्बीर बेपारी यांनी 'हेराल्ड' या वृत्तसंस्थेशी बोलताना दिलं आहे.

'हेराल्ड' या वृत्तसंस्थेशी बोलताना गोमांस कॉम्प्लेक्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश केनी गोमांस कमतरतेबाबत म्हणाले, "आम्ही प्राण्यांच्या कत्तलीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरवतो. कंत्राटदार व्यापाऱ्यांच्या आदेशानुसार प्राण्यांची कत्तलीची व्यवस्था करतो. आमच्या सेवांमध्ये कोणतीही अडचण नाही," असं डॉ. केनी यांनी स्पष्ट केले.

भारत जागतिक स्तरावर पशु उत्पादनांच्या बाजारपेठेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. २०२३-२४ मध्ये, भारताची पशु उत्पादन निर्यात ३७,६६५.५१ कोटी रुपये होती. ज्यामध्ये म्हशीचे मांस ३१,०१० कोटी रुपये होते, जे एकूण निर्यातीच्या ८२ टक्क्यांहून अधिक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; रितेश, रॉय की तिसराच?

Smart Electricity Meter: 3 वर्षांत प्रत्‍येक घराला 'स्मार्ट वीज मीटर' बसणार! वीज खात्याची तयारी; अचूक बिल, चोरी रोखण्यास मदत

Goa Rain: ..होत्याचे नव्हते झाले! किनारे मोकळे, मासेमारी ठप्प, शॅक्समध्ये शुकशुकाट, शेतीचे नुकसान; पावसामुळे गोव्याला मोठा फटका

Panaji Crime: पोलीस स्टेशनसमोरच 2 गटांत राडा! संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी; 3 टॅक्सी, 1 दुचाकी जप्त

Ranji Trophy: गोव्याची फॉलोऑननंतर ‘जिगर’! अभिनव-मंथनची झुंजार भागीदारी; कर्नाटकविरुद्ध लढत अनिर्णित

SCROLL FOR NEXT