Goa Accident: जीवघेण्या अपघातात देशात गोवा टॉप 10 मध्ये! सेव्ह लाईफ फाउंडेशनच्या संस्थापकांकडून चिंता व्यक्त; म्हणाले...

Goa Road Accident: संपूर्ण देशात रस्ता अभियांत्रिकीची कमतरता जाणवत असून अनेक कारणांमुळे रस्ता अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
Goa Accident: जीवघेण्या अपघातात देशात गोवा टॉप 10 मध्ये! सेव्ह लाईफ फाउंडेशनच्या संस्थापकांकडून चिंता व्यक्त
Goa AccidentsCanva
Published on
Updated on

सासष्टी: देशात जितके जीवघेणे अपघात घडतात, त्यात पहिल्या दहा राज्यांत गोव्याचा समावेश आहे. छोट्या राज्यात भीषण अपघात होणे ही चिंताजनक बाब आहे, म्हणूनच रस्ता सुरक्षा चळवळ अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन ‘सेव्ह लाईफ फाउंडेशन’चे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष तिवारी यांनी आज केले.

गोमंत विद्या निकेतनने आयोजित केलेल्या २५व्या विचार वेध व्याख्यान मालेत पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. संपूर्ण देशात रस्ता अभियांत्रिकीची कमतरता जाणवत असून अनेक कारणांमुळे रस्ता अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या मागे इतर अनेक कारणे असू शकतील. पण सद्यस्थितीत रस्ता सुरक्षा चळवळ अत्यंत महत्वाची असून त्यात सहभागी होणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असेही तिवारी म्हणाले.

Goa Accident: जीवघेण्या अपघातात देशात गोवा टॉप 10 मध्ये! सेव्ह लाईफ फाउंडेशनच्या संस्थापकांकडून चिंता व्यक्त
Goa Accident: वीजखांब, भिंतीला धडक देऊन ट्र्क कलंडला; मध्यधुंद चालकाचा हसापूरात थरार

तिवारी म्हणाले की, अपघात (Accident) झाल्याबरोबर वेदना शमवण्यासाठीची सेवा सर्वप्रथम अपघातग्रस्तांना मिळणे आवश्यक आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थापन, गती वरील नियंत्रण व्यवस्थापन, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी कॅमेरे, रस्त्यालगत लावलेले फलक लोकांना समजेल, अशा भाषेत असणे आवश्यक आहे. सरकारने अपघात टाळण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत, त्या लोकांनीही जाणून घेणे गरजेचे आहे, असे तिवारी यांनी सांगितले.

१०० महामार्गांवर संघटनेची देखरेख

आपली संघटना चांगले कायदे लागू करण्याच्या कार्यासाठी विशेष ओळखली जाते. ही संघटना पोलिस (Police) व नागरिकांना रस्ते अपघातात जखमींना मदत करण्यासाठी प्रशिक्षित करणे. सध्या संघटनेकडे देशातील १६ राज्यातील १०० राष्ट्रीय महामार्गांवर देखरेख व पाहणी करून दुरुस्ती सुचवण्याची जबाबदारी आहे. सध्या ३० रस्त्यांचे काम सुरू असून पुढील दोन वर्षांत अन्य सर्व रस्त्यांवरील काम सुरू होईल, असे पियुष तिवारी यांनी स्पष्ट केले.

Goa Accident: जीवघेण्या अपघातात देशात गोवा टॉप 10 मध्ये! सेव्ह लाईफ फाउंडेशनच्या संस्थापकांकडून चिंता व्यक्त
Goa Accident: गोव्यात नववर्ष साजरा करायला आले होते, अपघातात 2 वर्षांच्या मुलीला गमावलं; पेट्रोल पंपावर मनसून्न करणारी घटना

चिन्मयी सुमित यांचे व्याख्यान

प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित या ‘मातृभाषा आणि शिक्षक: संस्कारांचे आधारस्तंभ’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com