Traffic jam In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism : देशभरातील पर्यटकांचे पाय वळले गोव्याकडे; किनारे गजबजले

पर्वरीत वाहतूक संथगतीने; लाँग विकेंडचा व्यावसायिकांना फायदा

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Tourism : मे महिन्यातील संपत आलेल्या शाळांच्या सुट्या आणि ‘विकेंड’मुळे देशभरातील पर्यटकांचे पाय गोव्याकडे वळले आहेत. यात परदेशी पर्यटकांचीही भर पडल्याने या कडक उन्हातही गर्दीने फुललेले किनारे, वाहनांनी भरलेले रस्ते, बुकिंग फुल्ल झालेली हॉटेल्‍स अशी स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे मंदिरे आणि चर्च परिसरही गजबजले आहेत.

पर्वरीत रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा वाहने पार्क करण्‍यात आल्‍याने बराचकाळ वाहतूक संथ होती. सध्‍या राज्यातील उकाडा वाढल्याने स्थानिकांचे पायही किनाऱ्यांकडे वळले आहेत. कळंगुट, बागा, अंजुणासह दक्षिण गोव्यातील कोलवा, वार्का, बाणावली, पाळोळे किनाऱ्यांवर गजबजाट वाढला आहे.

कोरोनामुळे मागील काही काळापासून बंद असलेल्‍या पर्यटनाला चांगलीच उभारी मिळाली असून, राज्यातील पर्यटन व्यावसायिकांना दिलासा लाभला आहे, असे मत ट्रॅव्हल ॲन्‍ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष नीलेश शहा यांनी व्यक्त केले आहे.

वाढत्या पर्यटनाचा फायदा हॉटेल मालक, टॅक्सी चालक यांच्याबरोबर किनाऱ्यांवरील शॉकधारक आणि छोट्या व्यावसायिकांना होत आहे. मे महिना संपत आल्याने पर्यटनाला वेग आला आहे. मॉन्सूनचे वेध लागल्याने उरलेल्‍या काही शॅकधारकांनी आपले शॅक काढण्यासही सुरुवात केली आहे.

समुद्र स्नानासाठीही गर्दी

मे महिन्याच्या शेवटी समुद्रस्नान करण्याची परंपरा राज्यात आहे. त्यामुळे अनेक लोक समुद्र स्नानासाठी किनाऱ्यांवर गर्दी करत असून, दिवसभर समुद्र स्नानाचा आनंद लुटताना दिसत आहेत.
 
सर्वाधिक आकर्षण क्रूझ बोट, कॅसिनोंचे

सध्या पर्यटकांना सर्वांत जास्त आकर्षण क्रूझ बोट आणि कॅसिनोंचे असून, मोठ्या प्रमाणात पर्यटक आनंद घेत आहेत. कॅसिनो चालकांनी या विकेंडचा फायदा घेत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामुळे सध्‍या कॅसिनो फुल्ल दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT