Rohan Khanate Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: किनारा व्यवस्थापन होणार अधिक सुकर

Goa Beach: रोहन खंवटे : पर्यटन विभागाकडून ‘बीच व्हिजिल ॲप’चे अनावरण

दैनिक गोमन्तक

Goa Beach: राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त पर्यटन विभागाने गुरुवारी ‘बीच व्हिजिल ॲप’चे अनावरण केले. पहिल्यांदाच या ॲपमुळे पर्यटक तसेच स्थानिक लोकांना समुद्रकिनारा व्यवस्थापन वाढविण्यासाठी आणि समुद्र किनाऱ्याशी संबंधित विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत होणार असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री खंवटे यांच्या हस्ते आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील अंचिपका, गोवा इलेक्ट्रॉनिक्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी संचालक रेवती कुमार यांच्या उपस्थितीत ‘बीच व्हिजिल ॲप’चे अनावरण करण्यात आले.

आंचिपका म्हणाले की, या ॲपद्वारे वेळेवर अहवाल देण्यावर आणि समुद्र किनाऱ्यांवर उदभवू शकणाऱ्या समस्यांचे निरसन करण्यावर लक्ष केंद्रित करता येते. या ॲपद्वारे पर्यटकांना किनाऱ्यावरील घडामोडी, विविध समस्या जलद आणि प्रभावीपणे संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत कळविण्याची सुविधा दिली आहे. हे ॲप प्ले स्टोअरवरून तसेच क्यूआर कोड स्कॅन करूनही डाऊनलोड करता येते.

हेल्पलाईन क्रमांक 1364 फायदेशीर

बीच व्हिजिल ॲप समुद्र किनाऱ्यांवरील खासगी मालमत्तेशी संबंधित समस्या समाविष्ट करत नाही. तथापि, गोवा पर्यटन हेल्पलाईन क्रमांक - १३६४ वर डायल करून ॲपद्वारे इतर कोणत्याही समस्या किंवा उल्लंघनांची त्वरित तक्रार केली जाऊ शकते.

'ॲप’ची कार्यपद्धती

  • अ‍ॅपचे अंतर्गत मॅपिंग पूर्ण झाल्यावर नोंदवलेल्या उल्लंघनाची अधिकाऱ्यांकडून त्वरित दखल.

  •  संबंधित प्रकरणावर त्वरित कृतीची खात्री करण्यासाठी ऑटो-एस्केलेशन यंत्रणा. 

  • ॲप प्रणाली तत्काळ तक्रार करेल आणि संबंधित यंत्रणेच्या व्यक्तीस तक्रार केलेल्या समस्येचे निराकरण करण्यास पाचारण करेल.

  • त्वरित कारवाईचे महत्त्व ओळखून ॲपमध्ये संध्याकाळी ६ ते सकाळी ८ दरम्यान नोंदवलेली प्रकरणे वगळता समस्या सोडवण्यासाठी २ तासांचा कालावधी निश्चित केला आहे.

  • सध्या हे ॲप ॲन्ड्रॉईड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

  • भविष्यात आयफोन वापरकर्त्यांसाठी आयओएस आवृत्ती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT