Goa Shacks | Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa Beach Shack: उत्तर गोव्यात स्थानिकांचे 109 शॅक पोटभाड्याने, पर्यटन खात्याच्या पाहणीत धक्कादायक माहिती समोर

Goa shack licenses: पर्यटनमंत्री म्हणाले की, व्यवसाय सुलभीकरण आणि गुंतवणूक अनुकूलता अधिसूचना जारी केली आहे. ज्यामुळे कठोर नियम शिथिल करण्यात आले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa beach shack rules

पणजी: केवळ गोमंतकीयांसाठी राखीव असलेला शॅक व्यवसायही गोमंतकीयांनी आपल्या हाती ठेवला नसल्याची धक्कादायक माहिती पर्यटन खात्याने केलेल्या पाहणीत उघड झाली आहे. शॅकचे परवाने केवळ गोमंतकीयच मिळवू शकत असताना पर्यटन खात्याने दिलेले केवळ उत्तर गोव्यातील २०६ पैकी १०९ शॅक पोटभाड्याने दिले आहेत.

शॅकमधील कर्मचाऱ्यांकडून पर्यटकांना मारहाण होणे आणि किनाऱ्यावर फिरण्यास गेलेल्या एका गोमंतकीयाचा शॅकवाल्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर शॅक कोण चालवतात, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर ही पाहणी करण्यात आली. मात्र, हे शॅक गोव्याबाहेरील कितीजणांना आणि किती गोमंतकीयांना पोटभाड्याने दिले आहेत, याची माहिती मात्र उपलब्ध झालेली नाही. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आज रात्री संपादकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

पर्यटन व्यवसाय नोंदणीत ७४ टक्के वाढ

पर्यटनमंत्री म्हणाले की, व्यवसाय सुलभीकरण आणि गुंतवणूक अनुकूलता अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे मंजुरी आणि कागदपत्र प्रक्रियेत कपात, ज्यामुळे कठोर नियम शिथिल करण्यात आले आहेत.

कागदपत्रांची आवश्यकता कमी केली आहे. नूतनीकरण ७ दिवसांत मंजूर केले जाते. बहुतांश प्रकरणांमध्ये कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. त्यामुळे पर्यटन व्यवसाय नोंदणीमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. २०२२ च्या तुलनेत २०२४ मध्ये ७४ टक्के वाढ झाली.

पर्यटनपूरक पर्वरी टाऊन स्क्वेअर

पर्वरी टाऊन स्क्वेअर हे एक गतिशील सार्वजनिक स्थान असेल, जे प्रवेश प्लाझा, थीम असलेली मैदाने, संगीत कारंजे आणि एक भरभराटीचे बाजार क्षेत्र यांसह सुसज्ज असेल. यात १९७ कार आणि १५० दुचाकींसाठी बेसमेंट पार्किंगची सुविधा असेल. हे गोव्याच्या अंतर्गत भागातील पर्यटन सर्किटसाठी प्रवेशद्वार म्हणून काम करेल, अशी माहिती पर्यटनमंत्र्यांनी दिली. या विकासामुळे प्रवेशयोग्यता सुधारेल, पर्यटनाला चालना मिळेल आणि समर्पित ई-सायकल टूरच्या माध्यमातून पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे पर्यटकांना गोव्याच्या निसर्गरम्य भागांचा अनोख्या पद्धतीने अनुभव घेता येईल, असे त्यांनी सांगितले.

फर्मागुढीत डिजिटल म्युझियम

फर्मागुढी येथे गतिशील पर्यटन केंद्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल म्युझियम प्रस्तावित आहे, असे सांगून पर्यटनमंत्री म्हणाले, राज्यातील नॉन-बीच पर्यटन पायाभूत सुविधांना चालना दिली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे जागतिक स्तरावर संवर्धन आणि प्रचार, पर्यटकांसाठी ऐतिहासिक संदर्भ व अनुभव उपलब्ध करणे, पर्यटन अनुभव वाढवण्यासाठी इतिहास, अध्यात्म, साहस आणि पर्यावरणपूरक सुविधा आदींचा समावेश या प्रकल्पात आहे. पर्यावरण संरक्षणाला चालना देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला मदत होणार आहे. डिजिटल म्युझियम हा किल्ल्यांच्या जतनासाठी एक अभिनव प्रकल्प आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT