Bastora Tragic Incident Dainik Gomantak
गोवा

Tragic Death: चिमुकलीने गिळला जिवंत मासा, बस्तोड्यातील दुर्दैवी घटना; 6 वर्षाच्या बाळाचा मृत्यू

Bastora Tragic Death: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुरडी काही इतर लहान मुलांबरोबर घरात खेळत होती. खेळता खेळता तिने टबमधील जिवंत मासा उचलून तोंडात टाकला. त्यामुळे तिचा श्वास कोंडू लागला.

Sameer Panditrao

म्हापसा: बस्तोडा येथे रविवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. घरात खेळत असताना एका सहा महिन्याच्या चिमुकलीने पाण्याच्या टबमधून जिवंत मासा उचलून तोंडात टाकल्याने तिचा गुदमरून मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुरडी काही इतर लहान मुलांबरोबर घरात खेळत होती. खेळता खेळता तिने टबमधील जिवंत मासा उचलून तोंडात टाकला. त्यामुळे तिचा श्वास कोंडू लागला.

तिला तातडीने म्हापसा येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांना मुलीच्या वडिलांनी सांगितले की घरातील एका टबमध्ये मासे ठेवलेले होते.

सदर दुर्घटना घडली त्या वेळेस मुलगी एकटीच होती, त्यामुळे तिने मासा तोंडात घातल्याची शक्यता आहे. म्हापसा पोलिसांनी या घटनेची नोंद अनैसर्गिक मृत्यू म्हणून केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तप्रसाद पंडित करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT