Bardez Dainik Gomantak
गोवा

Bardez: मेगा प्रकल्पांचा परवाना मागे घ्या,अन्यथा तीव्र आंदोलन छेडू; कामुर्ली ग्रामस्थांचा इशारा

Kamurli Housing Project: कामुर्ली बार्देश येथील पंचायतीने प्रभाग २ मध्ये सर्व्हे क्रमांक ३२/१ बी व ३२/१ सी या जागेत स्थानिक पंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांना विचारात न घेता पंचायतीने मेगा हाऊसिंग प्रकल्पाला परवाना दिला आहे.

Sameer Amunekar

बार्देश: कामुर्ली बार्देश येथील पंचायतीने प्रभाग २ मध्ये सर्व्हे क्रमांक ३२/१ बी व ३२/१ सी या जागेत स्थानिक पंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांना विचारात न घेता पंचायतीने मेगा हाऊसिंग प्रकल्पाला परवाना दिला आहे. तो त्वरित मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा ग्रामस्थांनी पंचायतीला दिला.

आठ प्रशस्त बंगले व त्या प्रत्येक बंगल्याला जोडून स्विमिंग पूल असलेल्या या प्रकल्पाला काही पंचायत सदस्यांच्या मान्यतेने परवाना दिला असून तो परवाना त्वरित मागे घ्यावा, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

कामुर्ली पंचायतीसमोर मेगा हाऊसिंग प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पंचायत सदस्य संजना माशेलकर व ग्रामस्थ हजर होते. मेगा हाऊसिंग प्रकल्पासाठीची जागा पर्यावरण क्षेत्रात समाविष्ट असून या जागेत भलेमोठे वृक्ष व इतर झाडेही आहेत. प्रकल्पासाठी या झाडांची कत्तल केली जाईल. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल.

दरम्यान, कामुर्ली पंचायत प्रभाग दोनमध्ये सध्या पाणी, वीज समस्या भेडसावत आहे. असे असताना मेगा हाऊसिंग प्रकल्प उभा राहिला तर पिण्याचे पाणी, वीज या प्रकल्पासाठी वळविली मग ग्रामस्थांचे हाल होतील वीज, पाण्याशिवाय त्यांनी जगावे कसे? गावातील जनावरांना पाणी कसे मिळेल? या परिसरातील विहिरीत खारे पाणी शिरल्याने येथील लोकांना नळाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. पाण्याची कमतरता असताना जर मेगा प्रकल्प आले तर स्थानिकांच्या सुविधांचे काय? ग्रामस्थांचे हाल होतील वीज, पाण्याशिवाय त्यांनी जगावे कसे? जनावरांना पाणी कसे मिळेल, असे प्रश्न माशेलकर यांनी उपस्थित केले.

ग्रामस्थ श्रीमती कांदोळकर, गोकुळ नाईक, उषा पवार, रेश्मा वेर्णेकर, सचिन माशेलकर, कमलाकांत वेर्णेकर, देवेंद्र नाईक, न्यूबर्ट फर्नांडिस, सातार्डेकर यांनी सरपंचासमोर गाऱ्हाणे मांडून मेगा प्रकल्पास विरोध केला.

रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढा देऊ!

सचिन माशेलकर, कमलाकांत वेर्णेकर, देवेंद्र नाईक, न्यूबर्ट फर्नांडिस, सातार्डेकर यांनी आपले मेगा प्रकल्प विरोधी गाऱ्हाणे सरपंचासमोर मांडून मेगा हाऊसिंग प्रकल्पास विरोध केला. ग्रामस्थांना न जुमानता प्रकल्प उभा राहिल्यास त्या विरोधात शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आंदोलन छेडले जाईल.

पंचायतीने पर्यावरणाचा नाश होईल, असे प्रकल्प गावात आणू नयेत व मेगा हाऊसिंग प्रकल्पासाठी दिलेला दाखला कामाला सुरुवात होण्यापूर्वी मागे घ्यावा, अन्यथा ग्रामस्थ मुलाबाळांसह पचांयत कार्यालयासमोर ठाण मांडून बसतील व प्रकल्पाचे काम बंद होईपर्यंत लढा देतील, असा इशारा पंचायत सदस्य संजना माशेलकर यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT