Tarak Arolkar | Mapusa Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipal Council: म्हापशातील नगरसेवक तारक आरोलकरांचा जातीचा दाखला रद्द

बार्देश उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांनी दाखला रद्द केला

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Municipal Council: नगरसेवक तारक आरोलकर यांनी दिलेला जातीचा दाखला बार्देश उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांनी रद्द केला आहे. समाज कल्याण विभागाच्या छाननी समितीच्या निर्देशानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी दाखला रद्द केला.

माजी नगरसेवक फ्रँकी कार्व्हालो यांनी याप्रकरणी समाजकल्याण विभागाच्या तीन सदस्यीय छाननी समितीकडे धाव घेत तक्रार केली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली.

एप्रिल 2021च्या म्हापसा पालिका निवडणूकीत आरोलकरांनी ओबीसीचे खोटे प्रमाणपत्र सादर करुन ही निवडणूक लढवली होती. त्यानंतर, म्हापसा पालिकेच्या प्रभाग 7मधून आरोलकर ओबीसी आरक्षित प्रभागातून जिंकून आले होते.

माजी नगरसेवक फ्रँकी कार्व्हालो यांनी आरोलकर यांच्या विरोधात छाननी समितीकडे तक्रार केली होती. याप्रकरणी छाननी समितीने निवाडा देत म्हटले होते की, "म्हापसा पालिकेचे नगरसेवक तारक आरोलकर यांनी सादर केलेले कथित ओबीसी प्रमाणपत्र हे पडताळले गेले नाही. त्यामुळे बार्देश उपजिल्हाधिकार्‍यांनी सदर प्रमाणपत्र रद्द करावे." 

समितीच्या निर्देशानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी दाखला रद्द केला. दरम्यान तारक आलोरकरांचा दाखला रद्द झाल्याने आता आरोलकरांचे पद धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT