Bar industry in Goa Dainik Gomantak
गोवा

धक्कादायक! मृत व्यक्तीच्या नावे ‘बार’ परवाना

दैनिक गोमन्तक

पणजी: बेकायदेशीरपणे तसेच मृत व्यक्तीच्या नावे बारच्या परवान्याचे नूतनीकरण केल्याने अबकारी खात्याने आसगाव येथील सिली सोल कॅफे अँड बारचे अँथनी गामा याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांचा परवाना रद्द का करू नये, या नोटिशीला सात दिवसांत उत्तर द्यावे. उत्तर न दिल्यास परवाना रद्द करण्यात येईल.

(Bar license in the name of the deceased in goa)

अँथनी गामा किंवा त्यांच्या प्रतिनिधीने तसेच तक्रारदार रॉड्रिग्स यांनी येत्या 29 जुलैला सकाळी 11 वा. अबकारी कार्यालयात सुनावणीस उपस्थित राहण्याचे निर्देश आयुक्त नारायण गाड यांनी दिले आहेत.

सिली सोल कॅफे अँड बारच्या परवन्याचे नूतनीकरण मृताच्या नावाने केले असून हा परवाना बनवेगिरी करून घेतला आहे, अशी तक्रार ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी केली आहे. या तक्रारीच्या आधारे अबकारी खात्याने ही नोटीस बजावली आहे. अबकारी खात्याचा बार परवाना नावावर असलेली व्यक्ती 17 मे 2021 रोजी मृत झाली असूनही गेल्या जून 2022 मध्ये त्याचे नूतनीकरण केले आहे, असा दावा केला आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाईची मागणी रॉड्रिग्स यांनी केल्याचे नोटिशीत गाड यांनी नमूद केले आहे.

परवाना अन्य नावे वर्ग न केल्याने नियमभंग

‘आरटीआय’अंतर्गत सविस्तर माहिती घेऊन तक्रारदाराने तक्रारीसोबत जोडली आहे. या कागदपत्रांची तपासणी केली असता अँथनी गामा यांच्या नावे बार परवान्यासाठी 22 जून 2022 रोजी अर्ज करून त्यांच्या नावे सही केली आहे. सहा महिन्यानंतर परवाना दुसऱ्याच्या नावे केला जाईल, असे त्यात नमूद केले होते. परवाना धारकाचे निधन झाल्याने तो परवाना अन्य नावे करून बारचे नूतनीकरण न केल्याने अबकारी ड्युटी कायद्याचे उल्लंघन आहे, असे नोटिशीत म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

SCROLL FOR NEXT