म्हापसा: सिग्नल तोडणाऱ्या वाहन चालकांना जरब बसावी म्हणून म्हापशातील वाहतूक पोलिसांनी तब्बल 1979 वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्याची शिफारस वाहतूक खात्याकडे केली आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात कारवाईत जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे 67.26 लाख रुपये दंड वसूल केला आहे.
(1979 Recommendation for suspension of motorists' licences in goa)
वाहतूक परवाना निलंबित करण्याची शिफारस करताना जास्त वेगाने वाहन चालवल्याप्रकरणी 416, सिग्नल तोडल्याप्रकरणी 118, अवजड वाहनांतून प्रवाशांची वाहतूक केल्याप्रकरणी 154तर वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्याप्रकरणी 376 जणांचे परवाने निलंबित करा, अशी शिफारस म्हापसा वाहतूक पोलिसांनी आरटीओकडे केली आहे.
वाहतूक नियमभंग प्रकरणी एकूण 27,433 वाहन चालकांना चलन स्वरुपात दंड ठोठावला. यावर्षी आतापर्यंत 67.26 लाख रु. दंड वसूल केला आहे.
भरधाव वाहन चालवल्याची 416 प्रकरणे, मद्य पिऊन वाहन चालवणे 29, मोबाईल वापर 381, सिग्नल तोडणे 198, विनाहेल्मेट 10,401, अल्पवयीन 33, दुचाकीवर तिघे 384, चुकीचे पार्किंग 1704, सिट बेल्ट 1226, काळ्या काचा 1335,ओव्हरटेक करणे आदी उल्लंघनांचा समावेश आहे.
कोर्ट जंक्शन सिग्नल यंत्रणेत होणार बदल
म्हापसा कोर्ट जंक्शनवरील वाहतूक सिग्नल यंत्रणेत लवकरच बदल केले जाणार आहेत. सध्या जुने नादुरुस्त ट्राफिक सिग्नल हटविले असून, पुढील आठवडाभरात नवीन सिग्नल सुरु केले जातील. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांकडून सध्या या जंक्शनवरील वाहतूक नियंत्रित केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.