Tree Collapses At Mayem Dainik Gomantak
गोवा

Mayem News: वटवृक्ष कोसळून पाच वाहनांचा चुराडा; वीस लाखांचे नुकसान

Tree Collapses At Mayem: शेडखाली ठेवण्यात आलेल्या दोन कार आणि तीन दुचाकी चिरडल्या

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोलीतील जुन्या बसस्थानकावर जुनाट अवाढव्य झाड कोसळण्याच्या दुर्घटनेला आठ दिवस उलटण्यापूर्वीच, साधारण तशीच एक दुर्घटना मये परिसरात घडली आहे. कुंभारवाडा-मये येथे अत्यंत जीर्ण झालेला भलामोठा वटवृक्ष एका घरावर कोसळला. झाड कोसळल्यानंतर घरासमोरील पत्र्यांची शेड मोडली. या शेडखाली ठेवण्यात आलेल्या दोन कार आणि तीन दुचाकी चिरडल्या. काल मध्यरात्री ही घटना घडल्याने जीवितहानीसारखी मोठी आपत्ती टळली.

मात्र या घटनेत घरासह जवळपास वीस लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मदतकार्य पूर्ण झाल्यानंतरच नुकसानीचा निश्चित आकडा कळणार आहे. डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेतले आहे. मात्र झाड भलेमोठे आणि दुसऱ्याबाजूने जोरदार पावसाचा मारा, यामुळे मदतकार्यात व्यत्यय येत आहे.

काल मध्यरात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास कुंभारवाडा-मये येथील रमेश हरमलकर यांच्या घरावर हे झाड पडले. झाड अवाढव्य असल्यामुळे श्री. हरमलकर यांच्या घराच्या स्लॅबची मोडतोड झाली. तसेच अंगणातील पत्र्यांची शेड मोडून खाली पार्क केलेल्या तीन दुचाकी व दोन कार मिळून पाच वाहने चिरडली. श्री. हरमलकर हे मूर्तीकार असून, त्यांची गणपतीची चित्रशाळा आहे. झाड कोसळले, तेव्हा गणपतीच्या मूर्ती घडवण्याचे काम चालू होते. मात्र या घटनेत कोणालाच कोणतीच इजा झाली नाही. ही सारी ''विघ्नहर्त्या गणरायाची कृपा'' अशीच भावना हरमलकर कुटुंबीयांची आहे.

या घटनेची माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाचे अधिकारी राहूल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लिडींग फायर फायटर राजन परब आणि साईनाथ केसरकर यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेतली. मात्र काळोख आणि पावसाच्या तडाख्यामुळे मध्यरात्री मदतकार्य करणे अवघड होते. आज (शुक्रवारी) सकाळी मदतकार्य हाती घेण्यात आले.

प्रेमेंद्र शेट यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी मदतकार्याबाबत सूचना केली. दोन जेसीबीही उपलब्ध करून दिली. सकाळीही पुन्हा पाहणी करून ते विधानसभा अधिवेशनासाठी गेले.

दुसऱ्यांदा नैसर्गिक आपत्ती

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कुंभारवाडा-मये येथे ज्या घरावर झाड कोसळले, त्या हरमलकर यांच्याच घरावर भलेमोठे वडाचे झाड कोसळून घराची मोडतोड झाली होती. त्या घटनेतून हरमलकर कुटुंब नुकतेच कुठे सावरले होते. आता दुसऱ्यांदा त्यांना पावसाने तडाखा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT