Mayem Panchayat Building : मये पंचायत इमारतीचे आज लोकार्पण; प्रतीक्षा संपली

Mayem Panchayat Building : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार उद्‍घाटन
Mayem Panchayat Building
Mayem Panchayat BuildingDainik Gomantak
Published on
Updated on

Mayem Panchayat Building

तीनवेळा पायाभरणी करूनही गेली बरीच वर्षे प्रतीक्षेत असलेला मये पंचायत इमारत प्रकल्प अखेर पूर्ण झाला आहे. उद्या (सोमवारी) सायंकाळी ६ वाजता आयोजित सोहळ्यात पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.

यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह सरपंच सीमा आरोंदेकर व अन्य पंच सदस्य उपस्थित राहणार आहेत. या प्रकल्पावर जवळपास सव्वातीन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सध्याच्या पंचायत इमारत कार्यालय इमारतीसमोर हा नवीन प्रकल्प उभारण्यात आला आहे.

मध्यंतरी कामात निष्काळजीपणा केल्याच्या कारणावरून साधनसुविधा विकास महामंडळाकडून त्यावेळच्या संबंधित कंत्राटदाराला बाजूला करून फेरनिविदा काढून दुसऱ्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आले. या प्रकल्पाचा सुरवातीचा अंदाजित खर्च २ कोटी एवढा होता. मात्र, या प्रकल्पासाठी फेरनिविदा काढण्यात आल्याने या प्रकल्पाच्या खर्चात वाढ होताना ती ३ कोटीपेक्षा अधिक झाली.

तीनवेळा झाली होती पायाभरणी!

या प्रकल्पासाठी तीनवेळा पायाभरणी करण्यात आली. २७ डिसेंबर २०१६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. तत्पूर्वी पंचायत कार्यालयाची सध्याची इमारत मोडून त्याठिकाणी नवीन इमारत उभारण्यासाठी पायाभरणी करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या पंचायत मंडळाच्या कार्यकाळात चार वर्षांपूर्वी या इमारत प्रकल्पाची पुन्हा पायाभरणी करून इमारत प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. मात्र, ‘कोविड’ महामारीमुळे या प्रकल्पाच्या बांधकामात आडकाठी आली आणि बांधकाम रखडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com