Bank Holiday Dainik Gomantak
गोवा

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Banks Closed for Five Days: २०१५च्या दहाव्या द्विपक्षीय करारात महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी मान्य करण्यात आली होती.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करावा आणि कामगिरीशी निगडित प्रोत्साहन भत्त्यामधील भेदभाव दूर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी उद्या (शुक्रवार, ता. ११) देशभरातील बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. या संपाचा थेट परिणाम सर्व राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांच्या सेवांवर होणार आहे.

हा संप केवळ सुट्टीसाठी नाही, तर द्विपक्षीय कराराच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष आहे. २०१५च्या दहाव्या द्विपक्षीय करारात महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी मान्य करण्यात आली होती. अकराव्या करारात उर्वरित दोन शनिवारही सुट्टी देण्याची शिफारस बँक व्यवस्थापनांनी मान्य करून केंद्र सरकारकडे पाठवली होती.

इंडियन बँक्स असोसिएशन आणि संघटनांनी त्यावर स्वाक्षरीही केली आहे. मात्र, सरकार अंमलबजावणी करत नाही. ११ सप्टेंबरनंतर मागण्या मान्य न झाल्यास २८ ते ३० सप्टेंबर तीन दिवसांचा संप आणि ऑक्टोबरमध्ये बेमुदत संप करण्याचा इशारा दिला आहे.

तोडगा निघणार?

उद्यापासून राज्यातील बँका पाच दिवस बंद राहणार आहेत. ११ सप्‍टेंबर हा संपाचा दिवस असेल. १२ रोजी दुसरा शनिवार, पुढे रविवार, तसेच सोमवार आणि मंगळवारी चतुर्थीनिमित्त बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे शुक्रवारपासून बँका पाच दिवस बंद असतील. उद्या संपावर तोडगा निघतो का, हेही स्‍पष्‍ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

SCROLL FOR NEXT