Bank Robbery Accused  Dainik Gomantak
गोवा

Bank Robbery : केरी बँक दरोडा प्रकरणातील तिघांना शिताफीने पकडले

वाहन क्रमांकावरून लागला सुगावा; चोरीचे सोने, रोख रक्कम जप्त

दैनिक गोमन्तक

पणजी : केरी-सत्तरी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या व्यवस्थापकाचे अपहरण करून व पिस्तुलाचा धाक दाखवून बँक लुटलेल्या टोळीतील पाचपैकी तिघांना आज गोवा पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून 5.50 लाख रक्कम तसेच 1 किलो 100 ग्रॅम सोने पूर्णपणे जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील दोघे अजून फरारी असून लवकरच त्यांना गजाआड केले जाईल.

दरोडेखोरांनी बँक लुटण्यासाठी वापरण्यात आलेली व्हॅगनर गाडी (जीए 01 आर 7724), बँक व्यवस्थापकाला धमकावण्यासाठी वापरलेली एअर गन (पिस्तुल) व चाकू तसेच चोरलेली 8.75 लाख रोख रक्कमेपैकी 5.50 लाख रुपयांची रक्कम व 50 लाखांचे 1.100 किलो संशयिताकडून जप्त करण्यात आले आहे.

या टोळीतील दोघांची माहिती मिळाली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या दरोड्यातील ‘मास्टरमाईंड’ साहिल खान ऊर्फ इर्शाद पिर खान (32) याला काल रात्री अटक केल्यानंतर आज सकाळी जितेंदर कुमार (30) व राजू कुमार दास (24) याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक ओमविर सिंग बिष्णोई यांनी आज संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

संशयित साहिल खान हा केरी येथे राहत असून तो टॅक्सी व्यवसाय करतो. तर गोवा वेल्हा येथील संशयित जितेंदर कुमार हा लाद्या बसवण्याचे काम करतो तर संशयित राजू कुमार हा गवंडी म्हणून काम करतो. हे दोघेही मजुराचे काम करत असल्याने साहिल याची त्यांच्याशी ओळख झाली होती. सध्या फरारी असलेल्या त्या दोघांसह साहिल याने या बँकेवर दरोडा घालण्याचा पूर्वनियोजन केले होते. त्यासाठी या चारजणांची मदत घेतली होती. पैशांच्या हव्यासापोटी त्यांनी बँक लुटली.

रेल्वे पोलिसांची सतर्कता

बँकेवर दरोडा घातल्यानंतर टोळीतील संशयित राजू कुमार दास याने वास्को-पाटणा एक्सप्रेस रेल्वेमधून पलायन करताना रेल्वे पोलिसांनी त्याला रत्नागिरी येथे ताब्यात घेतले. त्याला मडगाव येथे आज आणण्यात आले. त्याच्याजवळ 1 लाख 20 हजाराची रोकड सापडली. त्याने या दरोड्यातील इतर चारजणांची नावे उघड केली. त्यानुसार डिचोली पोलिसांनी संशयित साहिल ऊर्फ इर्शाद खान व जितेंदर कुमार याना अटक केली.

दरोड्यापूर्वी केली रेकी

केरी येथील मास्टरमाईंड साहिल ऊर्फ इर्शाद खान याने बँकेच्या व्यवस्थापकाबद्दल माहिती जमविली. त्यानुसार नियोजन करत काही मजुरांना हाताशी घेतले. त्याने व्यवस्थापकाचा नेहमी बँकेतून जाणाऱ्या रस्त्याचा अभ्यास केला होता. या बँकेच्या चाव्या कोणाकडे असतात त्याची माहिती मिळवली. मात्र, दरोड्यासाठी वापरलेल्या गाडीचा क्रमांक न बदलता तोच ठेवल्याने पोलिसांना सुगावा मिळाला.

सुरक्षारक्षक ठेवण्याचे आवाहन : राज्यातील बहुतेक बँकांमध्ये रात्रीच्यावेळी सुरक्षारक्षक नसतो. काही बँकांतील सीसीटीव्ही बंद अथवा नादुरुस्त आहेत. नियमानुसार सुरक्षारक्षक माजी सैनिक किंवा प्रशिक्षित असावा.मात्र, पैसे वाचविण्यासाठी बँका सुरक्षारक्षक ठेवत नाहीत. त्यामुळे बँकांनी सुरक्षारक्षक ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT