Court Canva
गोवा

Goa Crime: बंगळूरमधून आले गोवा फिरायला, जंगलात केली प्रेयसीची हत्या; संशयिताविरुद्ध आरोप निश्चित

Dharbandora jungle murder: जिवाचा गोवा करण्यासाठी आपणही येते’ असे म्हणत रोशनी मोझेस (२२) ही आपला वर्गमित्र संजय केवीनबरोबर १५ जून रोजी गोव्यात आली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: आपल्या प्रेयसीचे दुसऱ्याशी संबंध असल्याच्या संशयातून तिला गोव्यात आणून गळा चिरून खून करणारा संजय केवीन एम. (बंगळुरू) याच्‍याविरोधात दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने खून आणि पुरावे नष्ट करण्याच्या गुन्ह्याखाली आरोप निश्चित केले आहेत.

जिवाचा गोवा करण्यासाठी आपणही येते’ असे म्हणत रोशनी मोझेस (२२) ही आपला वर्गमित्र संजय केवीनबरोबर १५ जून रोजी गोव्यात आली होती. मात्र, वाटेत धारबांदोडा येथील जंगलात नेऊन केवीनने तिचा सुऱ्याने गळा चिरून खून केला होता. या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांच्या न्यायालयाने सकृत्दर्शनी

पुराव्यांच्या आधारे आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला. सरकारी पक्षातर्फे ॲड. जतीन ठक्कर यांनी बाजू मांडली, तर तपास फोंडा पोलिस निरीक्षक विजयकुमार कवळेकर यांनी पूर्ण करून आरोपपत्र दाखल केले. संशयित आरोपी संजय केवीन याला कोलवाळ तुरुंगातून मडगाव न्यायालयात हजर करण्यात आले. खुनानंतर पोलिसांनी त्याला हुबळी येथे अटक केली होती.

बस तिकिटाने काढला संशयिताचा माग

खुनाच्‍या वेळी झटापटीत आरोपी संजयकडून बस तिकीट खाली पडले. याच तिकिटावरून पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचता आले. खुनानंतर संजय हुबळीमार्गे बंगळुरूकडे निघाला होता. गोवा पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली होती. दरम्यान, फोंडा पोलिसांनी सविस्तर तपास करून तसेच पुरावे व साक्षीदार गोळा करून मडगाव न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.

प्रेमाचा प्रवास थेट खुनापर्यंत

संजय केवीन आणि रोशनी मोझेस हे दोघे बंगळुरूतील वर्गमित्र होते. १५ जून रोजी संजयने जिवाचा गोवा करायचा’ असा निर्णय घेतला. रोशनीने ‘मीसुद्धा येते’ असे सांगून हुबळी येथे त्‍याच्‍यासोबत बसमध्ये चढली. गोव्‍याच्‍या हद्दीत आल्यानंतर धारबांदोडा येथे दोघे उतरले. नंतर तेथील जंगलात नेऊन संजयने तिचा गळा चिरून खून केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT