Bangaladeshi Lady arrested on dabolim airport Dainik Gomantak
गोवा

Goa : बनावट कागदपत्रांचा वापर करत गोव्यात घुसखोरी; बांगलादेशी महिला ताब्यात

गोवा पोलिसांनी एका परदेशी महिलेला दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ताब्यात घेतलं आहे.

आदित्य जोशी

बनावट कागदपत्रांच्या आधारे गोव्यात प्रवेश करणं एका परदेशी महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. गोवा पोलिसांनी एका महिलेला दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ताब्यात घेतलं आहे. या महिलेवर बनावट कागदपत्र आणि पासपोर्टचा वापर करत गोव्यात प्रवेश केल्याचा आरोप आहे. ताब्यात घेतल्यानंतर महिलेची पोलिसांकडून कसून तपासणी सुरु असून तिचा गोव्यात येण्याचं प्रयोजन चौकशीनंतरच कळणार आहे.

दाबोळी विमानतळावर आज सोमवारी सकाळी पोलिसांना एका परदेशी महिलेचा संशय आला. तसमीन बेगन असं या 32 वर्षीय महिलेचं नाव असून बनावट कागदपत्रांच्या आधारे तिने गोव्यात आणि साहजिकच भारतात प्रवेश केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. संशय आल्यामुळे दाबोळी विमानतळ पोलिसांनी महिलेच्या कागदपत्रांची तपासणी केली, ज्यात महिलेकडील पासपोर्टसह कागदपत्र बनावट असल्याचं समोर आलं. महिलेला ताब्यात घेत पोलिसांनी तिची चौकशी सुरु केली आहे.

दरम्यान या महिनेने याआधी अशाच प्रकारे घुसखोरी करत राजस्थानमध्ये वास्तव्य केल्याचा संशय आहे. मात्र त्यावेळी ती सरकारी यंत्रणांच्या नजरेत धुळफेक करण्यात यशस्वी झाली होती. मात्र यावेळी गोव्यातील पोलिसांना तिचा संशय आल्यामुळे त्यांनी तिच्या कागदपत्रांची चोखपणे तपासणी केली आणि पकडली गेली. या महिलेकडे भारतीय रहिवासी असल्याचं आधारकार्डही सापडलं आहे, जे बनावट असल्याचं स्पष्ट झालं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: 'कला अकादमीची काय दुरुस्‍ती केली'? खंडपीठाने मागितला अहवाल; अधिकाऱ्यांना देखरेख ठेवण्याचे निर्देश

Hindi Din 2025: मराठीनंतर जन्मलेली 'हिंदी' जगातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा कशी झाली?

Nepal Interim PM: सुशीला कार्की यांनी रचला इतिहास, बनल्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान VIDEO

Education Recruitment Scam: शिक्षण खात्यांत नोकर भरती प्रक्रियेंत घोटाळो, गोवा फॉरवर्डचो आरोप; Watch Video

Kelbai Goddess: हणजुणे धरणाच्या निर्मितीनंतर गाव जलाशयाखाली बुडाला, कदंबकालीन गुळ्ळेची 'केळबाय'

SCROLL FOR NEXT