Goa Bandoda Canva
गोवा

Bandora News: अभिमान! गोव्यातील 'या' गावाने पटकवला केंद्र सरकारचा सर्वोत्कृष्ट पर्यटन पुरस्कार

गोमन्तक डिजिटल टीम

Bandora Panchayat

फोंडा: फोंडा तालुक्यातील बांदोडा ग्रामपंचायतीला केंद्र सरकारच्या पर्यटन खात्यातर्फे सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून बांदोडा पंचायतीला पुरस्कार जाहीर केला आहे. धार्मिक तसेच सशक्त गाव विभागात बांदोडा पंचायतीची निवड करण्यात आल्याने बांदोडावासीयांसाठी ही बाब अभिमानाची ठरली आहे. या पुरस्काराचे वितरण येत्या २७ तारखेला जागतिक पर्यटनदिनी नवी दिल्लीत करण्यात येणार आहे.

बांदोडा पंचायतीच्या अखत्यारीतील सुंदर निसर्ग, गावाची रचना तसेच मंदिरांची मांदियाळी आणि निसर्गाला अनुसरून गावातील नागरिकांचे राहणीमान, विविध उत्सवांचे आयोजन, पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठीची साधने अशा विविध स्तरांवर बांदोडा ग्रामपंचायत क्षेत्र अव्वल ठरल्याने सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचा बांदोडा हा गाव असून तेथेच महालक्ष्मीला त्यांचे निवासस्थान आहे. मडकई मतदारसंघात वीजमंत्र्यांनी आपल्या कार्यकाळात आत्तापर्यंत अनेक देवालयांचे बांधकाम ढवळीकर ट्रस्टमार्फत केले आहे. सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले मिथिल ढवळीकर व इतरांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

ग्रामपंचायतीकडून स्वागत...

केंद्र सरकारने पुरस्कार जाहीर केल्यानंतर बांदोडा ग्रामपंचायतीने स्वागत केले आहे. एकापरीने हा आमच्या गावाचा गौरव असल्याचे बांदोडा पंचायतीचे सरपंच रामचंद्र नाईक यांनी म्हटले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पंचायत पातळीवरील पर्यटनाला वाव मिळेल, अशी आशा पंचायत मंडळाने व्यक्त केली आहे.

सुंदर मंदिरे आणि नैसर्गिक सौंदर्य...

बांदोडा गावातील सुंदर निसर्ग आणि त्याचबरोबर या गावात असलेली देवी महालक्ष्मी, देव नागेश, देव गोपाळ गणपती, देव रामनाथ तसेच इतर देवालयांची मांदियाळी अध्यात्मिक पर्यटनासाठी वाव देणारी ठरली आहेत. गावाची रचना तसेच पर्यटकांच्या भेटी त्याचबरोबर फर्मागुढी येथील शिवाजी महाराजांचा किल्ला अशा विविध स्तरावरील साधन आणि सुविधांचा विचार या पुरस्कारासाठी करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhutani Infra: ..तर 'वायनाड'ची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही! सांकवाळ येथे रॅलीतून 'भूतानी' विरोधात इशारा

Leopard In Goa: रात्रीच्या वेळी बिबट्याचा संचाराने लोकांच्यात दहशत! कोरगावात भीतीचे वातावरण

Mhadei River Dispute: कर्नाटकाने असं पळवलं पाणी, गोव्यातील वकिलांची फौज करते काय?

'काही वेळा काय करावे हेच समजत नाही'; प्रशिक्षक मार्केझनी FC Goaच्या असमाधानकारक कामगिरीची जबाबदारी स्वीकारली

Sattari News: ...आणि सभा तापली! सत्तरी शेतकरी सोसायटी आमसभेत आरोप प्रत्यारोपांमुळे गोंधळ

SCROLL FOR NEXT