Bandoda Road Accident Risk Dainik Gomantak
गोवा

Bandoda Road Accident Risk: बांदोड्यात गटारावरील लोखंडी जाळी उखडली; 6 महिन्यांपासून अपघाताचा धोका!

Public Works Department: रामनाथी, बांदोडा येथील मुख्य रस्त्यावर गटारावर बसवलेली लोखंडी जाळी गेल्या तब्बल सहा महिन्यांपासून उखडलेल्या अवस्थेत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

दुर्भाट: रामनाथी, बांदोडा येथील मुख्य रस्त्यावर गटारावर बसवलेली लोखंडी जाळी गेल्या तब्बल सहा महिन्यांपासून उखडलेल्या अवस्थेत आहे. या बिघडलेल्या जाळीमुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणावर दुचाकी, चारचाकी वाहने आणि स्थानिक नागरिकांची ये-जा सुरू असते.

रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या ओहळावरील लोखंडी जाळी उखडल्यामुळे वाहनांची चाके त्यात अडकण्याची किंवा घसरण्याची शक्यता असून, त्यामुळे गंभीर अपघात होऊ शकतो. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा अंधारात ही जाळी सहजपणे दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे त्वरित लक्ष देऊन उखडलेली लोखंडी जाळी पुन्हा सुस्थितीत बसवावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT