Banastarim Mercedes Accident  Dainik Gomantak
गोवा

बाणास्तरी मर्सडीज अपघात; मृतांच्या कुटूंबांना 50 लाख, जखमी हळर्णकर यांना 40 लाख, वनिताला 35 लाख देण्याचे हायकोर्टाचे आदेश

मेघना सावर्डेकरने जमा केलेल्या 2 कोटी रकमेतून क्लेम सेटलमेंट

Akshay Nirmale

Banastarim Mercedes Accident: क्राईम ब्रँचने या अपघाताबाबतचा सविस्तर अहवाल 60 दिवसात मोटर अॅक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनलकडे सोपवावा, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. या ट्रिब्युनलकडे या अपघातातील मर्सडीज कार ज्यांच्या मालकीची आहे, त्या मेघना परेश सावर्डेकर यांनी 2 कोटी रूपये यापुर्वीच जमा केले आहेत.

(Bombay High Court Goa Bench)

या अपघातात दिवार येथील फडते कुटूंबातील दोघांचा मृत्यू झाला होता तर अरूप करमरकर याचाही मृत्यू झाला होता. या दोन्ही कुटूंबांना प्रत्येकी प्रत्येकी 50 लाख रूपये द्यावेत, असे कोर्टाने म्हटले आहे.

तसेच अपघातातील जखमी आणि ज्यांना आता लकवा मारल्याने कायमस्वरूमी अंथरूणाला खिळलेले शंकर हळर्णकर यांना 40 लाख रूपये द्यावेत. तसेच अपघातातील आणखी एक जखमी वनिता भंडारी यांना 35 लाख रूपये द्यावेत.

वनिता भंडारी या देखील या अपघातात गंभीर जखमी झाल्या असून त्या आता अंथरूणाला खिळून असणार आहेत. 8 महिन्यांनंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे, त्यानंतर त्या स्वतःच्या पायावर उभा राहू शकतील की नाही, ते कळणार आहे.

शिवाय अपघातातील मृत अरूप करमरकर यांच्याशी वनिताचे लग्न ठरले होते.

तसेच या अपघातातील आणखी एक जखमी राज माजगावकर यांना 25 लाख रूपये द्यावेत, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

दरम्यान हायकोर्ट आज, बुधवारी या प्रकरणातील मेघना सावर्डेकर हिच्या याचिकेवर सुनावणी घेणार आहे. मार्दोळ पोलिसांनी बजावलेल्या समनला आव्हान देणारी याचिका मेघना सावर्डेकर हिने दाखल केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

SCROLL FOR NEXT