Banastarim Bridge Accident Experience  Dainik Gomantak
गोवा

'मित्राचा तो कॉल खोटा असावा अशी मी प्रार्थना करत होतो', बाणस्तारी अपघातात आई - बाबांना गमावलेल्या साहिलने सांगितला थरारक अनुभव

आपल्या आई वडीलांचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर साहिलवर बेतलेल्या प्रसंगाचे अनुभव कथन त्याने केले आहे.

Pramod Yadav

Banastarim Bridge accident Experience of youth working with goa police who lost both parents: गेल्या रविवारी गोव्यात बाणस्तारी येथे झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा बळी गेला. तर, तीनजण गंभीर जखमी झाले. याशिवाय आणखी चारजण किरकोळ जखमी झाले. या अपघातात दिवडी येथील फडते दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मुलगा साहील हा गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेत फोटोग्राफर म्हणून सेवा बजावत आहे.

आपल्या आई वडीलांचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर साहिलवर बेतलेल्या प्रसंगाचे अनुभव कथन त्याने केले आहे. अपघाताची माहिती देणारा फोन मित्राने केल्यानंतर तो फोन खोटा असावा अशी प्रार्थना मी करत होतो असे साहिलने म्हटले आहे.

अपघाताच्यापूर्वी साहील मित्रांसोबत दिवडी येथे मित्रांसोबत फुटबॉल खेळत होता. दरम्यान, एका खूनाच्या तपास प्रकरणी त्याला वास्को येथे बोलावण्यात आले. आईला लवकर मागे येतो असे सांगून साहील वास्कोला जाण्यासाठी बाहेर पडला.

दिवडी-रायबंदर येथे त्याने बाबा दुचाकीवरून घरी परतत असताना दिसले. दरम्यान, रात्री आठ वाजता त्याला अपघाताची माहिती देणारा मित्राचा फोन आला. बाबा दुचाकीवरून एकटेच घरी जाताने त्याने पाहिले असल्याने मित्राचा कदाचित गैरसमज झाला असावा असा समज त्याने केला.

"मला फोन येताच मी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात धाव घेतली. प्रवासात मी मित्राचा तो कॉल खोटा असावा अशी प्रार्थना करत होतो. रूग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी माझे बाब गेल्याचे सांगितले. माझ्या आईची माहिती अद्याप मिळत नव्हती, तिच्या फोनवर कॉल केला पण तो बंद येत होता."

"रूग्णालयातील सर्व वार्डमध्ये चौकशी केली पण ती मिळाली नाही. अपघाताच्या ठिकाणी ती असेल म्हणून मी घटनास्थळी असलेल्या पोलिसांना फोन केला. एक तासानंतर बाणस्तारी पुलाच्या शेजारी तिचा मृतदेह आढळून आला." असे साहिलने सांगितले.

साहिलची धाकटी बहीण पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबात त्यांचे आजी-आजोबा आहेत.

वडिलांनी आयुष्यभराची कमाई त्यांचे जुने घर दुरूस्त करण्यासाठी गुंतवली होती आणि पुढील महिन्यात गणेश चतुर्थीपूर्वी नवीन घरात प्रवेश करण्याचा त्यांचा विचार होता. असे साहिलने सांगितले. या प्रकरणाचा योग्य तपास करून अपघाताला दोषी असणाऱ्यांना योग्य शिक्षा मिळावी एवढीच अपेक्षा आहे. असेही साहिलने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT