Banastarim Bridge Accident: Amit Palekar Arrested Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident : परेशचा वाहन परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित

वैद्यकीय चाचणीत तो मद्याच्या अमलाखाली असल्याचा वैद्यकीय अहवाल मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Banastarim Bridge Accident पणजी, : बाणस्तारी अपघात प्रकरणातील चालक परेश सावर्डेकर याचा वाहन चालवण्याचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. वाहतूक खात्याच्या पणजी साहाय्यक संचालक कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

परेशची पत्नी मेघना सावर्डेकर हिचा वाहन परवाना वाहतूक खात्याने आधीच रद्द केला आहे. परेशला त्याचा वाहन चालवण्याचा परवाना का निलंबित करू नये, अशी विचारणा करणाऱ्या दोन नोटिसा पाठवल्या होत्या. त्यावेळी आपण कोठडीत असल्याने व्यक्तीशः सुनावणीस हजर राहू शकत नाही, असे कारण त्याने दिले होते.

त्यानंतर पुन्हा नोटीस पाठवली होती. त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने वाहतूक खात्याने ही कारवाई केली. अपघात झाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री परेशला ताब्यात घेतले होते. त्यावेळी केलेल्या वैद्यकीय चाचणीत तो मद्याच्या अमलाखाली असल्याचा वैद्यकीय अहवाल मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तरुणीची अजब ड्रायव्हिंग स्टाईल व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटीझन्स लोटपोट; म्हणाले, ''ब्रेकअप करुन आली...''

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT