Accident Dainik Gomantak
गोवा

Banastari News : बाणस्तारी अपघात अद्यापही आरोपपत्र नाही; फॉरेन्सिक अहवाल प्रलंबित

Banastari News : सहा महिने उलटूनही स्थिती तशीच

गोमन्तक डिजिटल टीम

Banastari News : तिसवाडी, बाणास्तारी पुलावर झालेल्या भीषण अपघाताला सहा महिने उलटूनही गोवा पोलिस खात्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेला आरोपी श्रीपाद ऊर्फ परेश सिनाई सावर्डेकर याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास अपयश आले आहे.

६ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आणि इतर तीनजण गंभीर जखमी झाले, त्यापैकी काहीजण धक्क्यातून सावरलेले नाहीत.

पुण्यातील केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा (सीएफएसएल) आणि वेर्णा येथील राज्य एफएसएल यांच्या प्रलंबित अहवालांमुळे आरोपपत्रास विलंब झाला आहे. आरोपी परेश सावर्डेकराची आधीच जामिनावर सुटका झाल्याने कोणतीही निकड नाही आणि शिवाय न्यायवैद्यक अहवाल प्रलंबित आहेत.

आम्ही या प्रयोगशाळांना नमुने तपासण्याची प्रक्रिया जलद करून अहवाल सादर करण्यासाठी स्मरणपत्र पाठवले जाईल,अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

बाणास्तारी झालेल्या अपघातात मुड्डी, दिवाडीतील दाम्पत्य सुरेश आणि भावना फडते आणि धारबांदोडा येथील अनूप कर्माकर याचा मृत्यू झाला होता, तर वनिता भंडारी, राज माजगावकर आणि शंकर हळर्णकर जखमी झाले होते.

पुराव्यांचे विश्‍लेषण रखडले ‘सीएफएसएल’ पुणेने आधीच गुन्हे शाखेला कळवले होते, की रक्ताचे डाग आणि डीएनए नमुने, कॉल डिटेल्स आणि इतर पुराव्यांचे विश्लेषण करण्यासाठी तीन महिने लागू शकतात,असे सांगण्यात आले होते.

मात्र,अजूनही अहवाल मिळालेले नाहीत. हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर, आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यापूर्वी अभिप्रायासाठी अभियोजन पक्षाकडे सादर केले जाईल. अपघाताच्या वेळी मर्सिडीज बेंझ चालवणारा परेश होता, त्याची पत्नी मेघना नाही, याची पुष्टी झाली आहे.

‘आप’नेते पालेकरांनाही झाली होती अटक

म्हार्दोळ पोलिसांच्या प्राथमिक तपासात काही गंभीर त्रुटी असूनही गुन्हे शाखेने परेशच्या ‘डीएनए’शी जुळण्यासाठी मर्सिडीज एअरबॅगमधील रक्ताच्या डागांसह जुने आणि ताजे पुरावे सादर केले होते.

अपघातानंतर सुमारे आठ तासांनी दारूच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवल्याबद्दल परेशला अटक करण्यात आली. त्यात सावर्डेकर जोडपे प्रभावशाली असल्याने जाणूनबुजून तपासात घोळ केल्याचे आरोप ही म्हार्दोळ पोलसांवर झाले होते.

तसेच यात प्रकरणात पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली ‘आप’चे गोवा अध्यक्ष अ‍ॅड. अमित पालेकर यांना अटक करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

SCROLL FOR NEXT