MLA Sankalpa Amonkar dainik gomantak
गोवा

Ban Online Gambling: ऑनलाइन जुगारावर बंदी घाला, संकल्प आमोणकर यांची मागणी

योग्य कारवाई करण्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आश्वासन

गोमन्तक डिजिटल टीम

ऑनलाइन जुगारावर बंदी घालावी अशी मागणी काँग्रेस आमदार संकल्प आमोणकर (MLA Sankalp Amonkar) यांनी आज (दि.22) विधानसभेत केली. आमोणकर म्हणाले राज्यात ऑनलाईन जुगारचे प्रमाण वाढले आहे. विशेष करून ऑनलाईन रम्मी हा जुगार सर्रासपणे खेळला जात आहे. युवावर्ग याकडे आकर्षित होत असून त्याला बळी पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.

संकल्प आमोणकर म्हणाले, गोव्यात रम्मी, थ्री कार्ड, पोकर यासारखे अनेक ऑनलाईन जुगार खेळले जात आहेत. अनेक युवकांना याचे व्यसन लागत असून ही चिंतेची बाब आहे. तेलंगणा, सिक्किम, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि नागालँड या राज्यांनी ऑनलाईन जुगारावर बंदी घातली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी याच्या आहारी गेले आहेत.

आमोणकर यांनी यावेळी आपल्या मित्राच्या मुलाचे उदाहरण दिले. ऑनलाईन जुगाराच्या व्यसनात पाच लाख रूपये गमावले असल्याचे सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) म्हणाले, यासंबधित योग्य माहिती घेऊन योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT