Ban Mineral Transportation|Pissurlem  Dainik Gomantak
गोवा

पिसुर्लेच्या खनिज वाहतुकीवर बंदी कायम

स्थानिक शेतकरी आणि नागरिकांना मिळाला न्याय, गोवा फाउंडेशनचा अर्ज

दैनिक गोमन्तक

पणजी : पिसुर्लेहून आणलेला व सध्या कंपनीच्या आमोणा धक्‍क्यावर साठवलेला लोह खनिजसाठा ट्रक वाहतुकीद्वारे नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सेझा रिसोर्सेजला मनाई केली आहे. दामोदर मंगलजी कंपनीच्या पिसुर्ले खाणीवरून सेझाने 2.95 लाख टन लोह खनिज खरेदी केले होते. 19 जानेवारी 2022 रोजी ई-लिलावाद्वारे खरेदी केलेले हे खनिज आपल्याला वाहतुक करू देण्यास मान्यता द्यावी, अशा आशयाचे प्रतिज्ञा पत्र सेझाने उच्च न्यायालयात सादर केले होते. या साठ्यातील 1.8 लाख टन खनिज कंपनीने यापूर्वीच वाहतुकीद्वारे उचलले आहे.

गोवा फाउंडेशनने एका सार्वजनिक हिताच्या याचिकेद्वारे ई-लिलाव व तीन लाख टन खनिजाच्या वाहतुकीस विरोध दर्शविला आहे. सदर खाण लिज कधीही चालू स्थितीत नव्हती. जवळपासच्या लिजभागातून पर्यावरण व खाण कायद्याचे उल्लंघन करून सदर खनिज साठा प्राप्त करण्यात आला आहे, असा गोवा फाऊंडेशनचा दावा आहे.

गोवा फाऊंडेशनच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. नार्मा अल्वारिस यांनी म्हटले, खाण संचालकांनी एका प्रतिज्ञापत्राद्वारे दिलेल्या माहितीनुसार सदर खाण लिजधारकांने उल्लंघन केलेल्या अनेक बाबींची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी चालवली आहे. ‘‘लिजधारकांनी खरोखरीच बेकायदेशीर कृत्ये केली असती तर खनिज साठा जप्त करून लिज धारकाला अटक करणे आवश्‍यक आहे. तपासपथकाच्या मान्यतेशिवाय ई लिलाव अंगीकारणे चुकीचे होते. याचाच अर्थ संपूर्ण खनिज साठा गुन्हेगारी स्वरुपाने प्राप्त करण्यात आला आहे’’, असा दावा ॲड. आल्वारिस यांनी केला. सदर खाणीवर काढून ठेवलेला तीन लाख टन खनिज साठा हा पूर्णतः बेकायदेशीर आहे. तसेच तेथे खनिज उचलल्याच्या कोणत्या खुणाही नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सायंकाळी गोव्याचा एक मूड असतो! त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही; भाषण उरकत घेत अमित शहांची मिश्किल टिप्पणी

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

Rohit Sharma Captaincy: 'राजकीय' खेळात 'हिटमॅन' रोहितची विकेट! टीम इंडियावर गंभीर आरोप, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT