EVM Machine  Dainik Gomantak
गोवा

EVM Machine : ‘ईव्हीएम’ वर बंदी घाला, लोकशाही वाचवा; गोवन अगेन्स्ट ईव्हीएम'ची मागणी

EVM Machine : डिचोलीत केली जागृती; ‘ईव्हीएम’ मतदान प्रक्रियेमुळेच भाजप सत्तेचाच नव्हे, तर अमुक-अमुक जागा मिळतील, असा दावा करीत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

EVM Machine :

डिचोली, ''ईव्हीएम''वर बंदी घाला, भारतीय संविधान आणि लोकशाही वाचवा'', अशी घोषणा करीत ‘गोवन्स अगेन्स्ट ईव्हीएम’ या नागरी संस्थेने आज (शनिवारी) डिचोलीत जागृती केली. यावेळी ध्वनीचित्रफितीद्वारे काही प्रसंग दाखवून ‘ईव्हीएम’ पद्धतीला का आणि कसा विरोध आहे. त्याबद्धल माहिती दिली.

‘ईव्हीएम'' विरोधात 'गोवन्स अगेन्स्ट ईव्हीएम'या नागरी संस्थेतर्फे येत्या सोमवारी (ता.४) पणजी येथे आझाद मैदानावर शक्तीप्रदर्शन करण्याचे ठरविले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी डिचोलीत बसस्थानक परिसरात जागृती घडवून आणली.

‘ईव्हीएम’ द्वारे मतदान हा भाजपचा मोठा जुमला आहे. ‘ईव्हीएम’ द्वारे मतदान सुरु झाल्यापासून देशात लोकशाहीवर मोठा आघात झाला आहे. ‘ईव्हीएम’ मतदान प्रक्रियेमुळेच भाजप सत्तेचाच नव्हे, तर अमुक-अमुक जागा मिळतील, असा दावा करीत आहे.

अशी टीका ''गोवन्स अगेन्स्ट ईव्हीएम''चे रामा काणकोणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केली.

यावेळी त्यांनी ''ईव्हीएम''मुळे मतदान प्रक्रियेत घोळ कसा करणे शक्य आहे. त्यासंबंधी उदाहरणासह मार्गदर्शन केले. 'ईव्हीएम' पद्धत बंद करुन पुर्वीप्रमाणे मतपत्रिकेद्वारे मतदान केले नाही. लोकशाहीचा विनाश अटळ असून, भविष्यात देशवासियांवर पश्चाताप करण्याची पाळी येईल. असेही काणकोणकर म्हणाले.

सोमवारी चलो पणजी

‘ईव्हीएम’ वर बंदी घालून लोकशाही वाचवावी. या मागणीसाठी ‘गोवन्स अगेन्स्ट ईव्हीएम’तर्फे सोमवारी पणजीतील आझाद मैदानावर शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे. असे आवाहन यावेळी करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

Modi Government: मोदी सरकारसाठी पुढचे तीन महिने कसोटीचे; विरोधकांचे ‘नॅरेटिव्ह’ उलटवण्याचे आव्हान

SCROLL FOR NEXT