Goa Accident Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 'हॉलिवूड' स्टाईल अपघात! बांबोळीत कार हवेत उडून दुसऱ्या वाहनावर विसावली, काही काळ वाहतूक कोंडी

Goa Accident: बांबोळी उड्डाणपुलावर रविवारी दुपारी चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. यात एक कार हवेत उडून दुसऱ्या वाहनावर जाऊन विसावली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: बांबोळी उड्डाणपुलावर रविवारी दुपारी चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. यात एक कार हवेत उडून दुसऱ्या वाहनावर जाऊन विसावली. त्यामुळे एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे की काय, असे वाटत होते. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.

या अपघातात उलटलेली कार एका पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीवर धोकादायक स्थितीत अडकली होती, त्यामुळे नाट्यमय दृश्य निर्माण झाले. यामुळे बघ्यांची गर्दी वाढली. परिणामी, बायपास रस्त्यावरही वाहने थांबल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

मात्र, रविवार असल्याने वाहनांची संख्या तुलनेने कमी होती. वाहतूक पोलिस व आगशी पोलिस घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम केले. विशेष म्हणजे, या अपघातात चालकांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.

वाहतूक कोंडी

वाहने हटविताना क्रेनचा वापर करण्यात आल्याने एक मार्ग बंद ठेवावा लागला. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या अपघाताची नोंद आगशी पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

SCROLL FOR NEXT