BalRath Employees on Strike  Dainik Gomantak
गोवा

BalRath Employees Strike: बालरथ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांचे अतोनात हाल

मुख्यमंत्र्यांकडून वेतनवाढीचे संकेत; आजच्या बैठकीत तोडगा

दैनिक गोमन्तक

BalRath Employees on Strike : वेतनवाढीसाठी संपावर गेलेल्या युनायटेड बालरथ कामगार संघटनेबरोबर आज झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने उद्या (बुधवारी) नव्याने बैठक घेण्यात येईल आणि वेतनवाढीच्या प्रस्तावावर तोडगा काढला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

गेल्या दोन दिवसांपासून बालरथ कर्मचारी संपावर गेल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. या मुद्यावर आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात आली होती.

त्यावर सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी, या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवले असून शिक्षण संचालक शैलेश झिंगडे आणि संघटनेच्या नेत्या स्वाती केरकर यांच्याबरोबर चर्चा झाल्याचे सांगितले.

सरकारने वाढवलेले वेतन तुटपुंजे असल्याचे इतर आमदारांनी सांगून सहानुभूती दाखवली.

बालरथावर ४ लाख १६ हजार खर्च

विद्यार्थ्यांची सोय व्हावी, यासाठी राज्य सरकारच्या शिक्षण संचालनालयाकडून सुरू केलेल्या बालरथावरील कर्मचारी हे अर्धवेळ ग्राह्य धरले असून चालकाला दरमहा १२ हजार रुपये, साहाय्यकाला ६ हजार रुपये वेतन देण्यात येते.

याशिवाय दुरुस्तीसाठी दरवर्षी ५० हजार आणि इतर बाबींसाठी ५० हजार असे प्रति बालरथावर ४ लाख १६ हजार रुपये खर्च करण्यात येतात, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

या कर्मचाऱ्यांना यापुढे ११ महिन्यांचे वेतन देण्यात येणार आहे. शिवाय ते तीन टक्के वाढीने असेल, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT