Balrath Caught Fire Dhargal  Dainik Gomantak
गोवा

Dhargal Balrath Fire: धारगळमध्ये 'बालरथ'ला अचानक लागली आग

सुदैवाने कुणीही जखमी नाही

Akshay Nirmale

Balrath Caught Fire in Dhargal: गोव्यात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या एका बालरथ गाडीला आग लागल्याची घटना घडली आहे. उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील धारगळ येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली.

धारगळ येथील रेडेकर हॉस्पिटलजवळ एका गॅरेजमध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते. तिथेच हा बालरथ उभा होता. वेल्डिंगच्या ठिणग्यांमुळेच ही आग लागल्याचा संशय आहे. बालरथाने पेट घेतल्यानंतर त्याची तीव्रता पाहून परिसरात भीती निर्माण झाली होती.

आजुबाजूच्यांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र काही वेळातच बालरथाला लागलेल्या आगीने मोठे रूप धारण केले. काळ्या धुराचे मोठे लोट आकाशात उठत होते. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी आग विझवेपर्यंत बालरथ पुर्णतः खाक झाला होता. मुख्य रस्त्याच्या कडेलाच ही घटना घडल्याने येथे बघ्यांची, वाहनधारकांची गर्दी झाली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.

दरम्यान, या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT