Balli School Bus Accident Dainik Gomantak
गोवा

Balli Balrath Accident: बेदरकारपणे बस चालवून मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बालरथ चालकाची जामिनावर सुटका...

मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकाला जामीन मंजूर कसा करण्यात आला, असा सवाल पालक उपस्थित करत आहेत.

Kavya Powar

Balli School Bus Accident: गेल्या महिन्यात बाळ्ळी येथे झालेल्या बालरथ स्कूल बसच्या अपघातातील बसचालकाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकाला जामीन मंजूर कसा करण्यात आला, असा सवाल पालक उपस्थित करत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, 7 डिसेंबर 2023 रोजी सकाळी कुंकळ्ळीला विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना बालरथ बसचा अपघात झाला. यामध्ये 27 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले, तर 5 विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले होते.

बसचे स्टिअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याचे चालकाने सांगितले. मात्र चालक बेदरकारपणे भरधाव वेगात बस चालवत असल्याचे तपासात उघड झाले. यानंतर कुंकळ्ळी पोलिसांनी प्रभाकर वेळीप (46) या चालकाला भादंसंनुसार 279 आणि 337 कलमांतर्गत ताब्यात घेतले होते. मात्र त्याची आता जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

चालकाची सुटका केल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. दरम्यान, ज्यावेळी अपघात घडला तेव्हा पोलिसांनी या रस्त्याची पाहणी केल्यानंतर या रस्त्याच्या बाजूला क्रॅश बॅरियर्स बसविण्याची तातडीची गरज असल्याचे या विभागाने सार्वजानिक बांधकाम खात्याला पाठविलेल्या पत्रात म्हटले. अशाप्रकारचे अपघात घडल्यास प्राणहानी होण्याची शक्यता अधिक असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: बुध अन् शुक्राचे महागोचर! 11 जूनला पालटणार 3 राशींचं नशीब; गुंतवणुकीतून मिळणार दुप्पट परतावा

खरी कुजबुज: मनोज उत्तर कर्नाटक संघर्ष सेनेच्‍या संपर्कात

Goa Politics: आमदार वीरेश बोरकर मांडणार भूमिका? पक्षातील अंतर्गत वाद आणि मनोज परब यांच्‍याबाबत काय बोलणार?

Pakistan Bus Accident: एक्सप्रेसवेवर काळाचा थरार, दोन बसेसची जोरदार धडक! पाकिस्तानात भीषण अपघात; 17 प्रवाशांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

Vaibhav Sooryavanshi: 50 चेंडूंचे चॅलेंज 25 चेंडूंतच संपवले! वैभव सूर्यवंशीचे मैदानावर वादळ, ठोकलं शानदार शतक Watch Video

SCROLL FOR NEXT