Goa News 21 January 2024: दिवसभरात घडलेल्या राज्यातील घटनांचा आढावा

Goa Breaking News 21 January 2024: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाची बेकिंग न्यूज
Goa Updates
Goa Updates Dainik Gomantak
Published on
Updated on

स्पोर्टिंग क्लबला विजयाची हुकलावणी

 सामन्यातील पाच मिनिटे बाकी असताना गोल स्वीकारल्यामुळे आय-लीग २ फुटबॉल स्पर्धेत स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाला विजय हुकला.

वास्को येथील टिळक मैदानावर रविवारी झालेल्या लढतीत त्यांना सुदेवा दिल्ली एफसीने १-१ असे गोलबरोबरीत रोखले.

संघातील नवा खेळाडू मार्क कार्व्हालो याने चौथ्या मिनिटास केलेल्या गोलमुळे स्पोर्टिंग क्लब विजयाच्या दिशेने कूच करत होता.

अझान, राहुलच्या शतकांमुळे त्रिशतकी मजल

सलामीचा अझान थोटा (१३१) व कर्णधार राहुल मेहता (नाबाद १०२) याच्या शानदार शतकांच्या बळावर कर्नल सी. के. नायडू करंडक 23 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याने केरळविरुद्ध पहिल्या डावात त्रिशतकी मजल मारली.

सांगे येथील जीसीए मैदानावर रविवारपासून सुरू झालेल्या चार दिवसीय सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर यजमान संघाने ४ बाद ३१२ धावा केल्या.

होंडा सत्तरी येथे ट्रक- कंटेनर यांच्यात अपघात, एक जखमी

होंडा सत्तरी येथील स्नेहा हाॅटेल समोर ट्रक आणि कंटेनर यांच्यात अपघात झाला असून या अपघातात खडी घेऊन जाणारा ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटल्याची घटना घडली आहे. सदर ट्रक हा गोवा पासिंग असून कंटेनर महाराष्ट्र पासिंगचा असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाल्याची माहिती मिळली आहे. या अपघाताने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र स्थानिकांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

ड्रग्ज तस्कर सोलोमनचा जामीन न्यायालयाने फेटाळला

म्हापसा येथे छापा टाकून अटक केलेल्या ड्रग्ज तस्कर उगोचुक्वू सोलोमन उबाबूको (39) या नायजेरियन नागरिकाचा जामीन म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

याबाबतचा आदेश न्या. शर्मिला पाटील यांनी दिलाय. सदर अटक करण्यात आलेला उबाबूको हा ड्रग्ज तस्करीतून उदरनिर्वाह करत असल्याचे नाकारता येत नसल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने या नायजेरियन नागरिकाचा जामीन फेटाळला आहे.

मडगाव मैफिलीवरून काँग्रेसचा भाजपवर घणाघात

"गोव्यातील प्रतिभावान कलाकारांना बाजूला सारुन, श्री राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे संगीतमय कार्यक्रम भाजप सरकारने गोव्याबाहेरील कलाकारांना दिले. हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्वयंपूर्ण गोवा आहे का?

कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे गोव्यातील कलाकारांना संधी कधी देणार? असा सवाल गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे समाजमाध्यम प्रमुख दिव्या कुमार यांनी केला आहे.

क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचे निधन

जाईडवाडा खांडोळा येथील रोहिदास नाईक ( वय 52 ) या विवाहित इसमाचे क्रिकेट खेळत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक घटना समोर येतेय.

खांडोळा येथील मैदानावर क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोहिदास नाईक या खेळात सहभागी झाला होता. खेळ सुरू असताना क्षेत्र रक्षण करण्यासाठी उभा असलेला दुपारी पाऊणच्या दरम्याने अचानक मैदानावर कोसळला.

तिवरे-वरंगावमध्ये 22 जानेवारीला मांसाहार विक्रीवर बंदी

22 जानेवारीला होणाऱ्या राममूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त तिवरे-वरंगाव पंचायत कार्यक्षेत्रात मांस-मासळी, मद्य दुकाने, चायनीज स्टॉल बंद राहणार आहेत. याबाबत पंचायतीतर्फे संबंधित अस्थापनांसाठी सार्वजनिक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

बेदरकारपणे बस चालवून मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बालरथ चालकाची जामिनावर सुटका...

गेल्या महिन्यात बाळ्ळी येथे झालेल्या बालरथ स्कूल बसच्या अपघातातील बसचालकाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकाला जामीन मंजूर कसा करण्यात आला, असा सवाल पालक उपस्थित करत आहेत.

 पर्वरीतील ट्रॅफिक जॅम आता नित्याचेच!

पर्वरी जंक्शनवर आसामची एक बस अडकल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. एका तासाहून अधिक काळ वाहनचालक ट्रॅफिकमध्ये अडकल्याने संतप्त.

सेल इंडिया नॅशनल 2024 कात्याने पटकावले सुवर्णपदक

मुंबई येथे झालेल्या सेल इंडिया नॅशनल 2024 मध्ये गोव्याच्या कात्या कोएल्होने सुवर्णपदक पटकावले. आपल्या राज्यासाठी पटकावलेले कात्याचे हे 19 वे सुवर्णपदक आहे.

अभिमानास्पद! दाबोळी विमानतळाला सर्वोत्कृष्ट विमानतळाचा बहुमान

प्रतिवर्षी 5-10 दशलक्ष प्रवाशांसोबत उड्डाण केल्याबद्दल विंग्स इंडिया सोहळ्यात दाबोळी विमानतळाला या वर्षातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला. गोवा विमानतळ संचालकांंनी नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्याहस्ते हा बहुमान स्वीकारला.

इंडिगो एअरलाइन्सवर पुन्हा प्रवासी भडकले! दाबोळी विमानतळावर फ्लाईटला उशीर झाल्याने तणाव

दाबोळी विमानतळावरून शनिवारी (20 जानेवारी) रात्री 11.45 ला नियोजित असलेली दाबोळी-मुंबई (6E-205) फ्लाईटला उशीर होणार असल्याचे प्रवाशांना कळवण्यात आले. मात्र आज दुसरा दिवस उजाडला तरी उड्डाण करण्यात न आल्याने प्रवासी भडकले.

त्यांनी याबाबत जाब विचारायला सुरुवात केली. यावेळी विमानतळावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने उड्डाणाला उशीर झाल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात येत होते. मात्र ठराविक वेळ सांगण्यात न आल्याने प्रवासी अधिकच संतापले.

धार्मिक सलोख्यासाठी गावागावांत उत्सव होणे गरजेचे : डाॅ. दिव्या राणे

वाळपई, अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या  उद्‌घाटनाचा सोहळा एका दिवसावर आला आहे, त्याची सर्वांना उत्सुकता  लागलेली आहे. सध्या सर्वत्र प्रसन्न व आनंदाच्या वातावरणात प्रभू श्रीरामाच्या  आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे.

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेसाठी गोवेकर सज्ज! 'या' पंचायतींनी घेतला मांसाहार विक्री बंदीचा निर्णय

अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यादिवशी म्हणजेच सोमवारी (ता. २२) राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळांवर श्री राम पूजन मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे. यादिवशी राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी त्यांच्या क्षेत्रात मद्य, तसेच मांसाहारी पदार्थ विक्रीवर बंदी घातली आहे.

यानिमित्त अस्नोडा पंचायतीने एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, येत्या सोमवारी २२ रोजी अस्नोडा पंचायत कार्यक्षेत्रातील सर्व दुकाने, मद्यालये, चिकन सेंटर व मासळी मार्केट बंद ठेवावे असे निर्देश दिलेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com