वास्को: धुरंधर आणि दूरदर्शी राजकारण, निर्भीड आणि तत्पर निर्णय क्षमता, राजकीय शह-काटशहामध्ये निपुण. प्रसंगी कठोर आणि तितकेच प्रामाणिक व्यक्तिमत्त्व पर्रीकरांचे होते.
माणसांमधला वेगळा माणूस म्हणजेच मनोहर पर्रीकर ऊर्फ भाई, अशी शब्दसुमनांजली प्रसिद्ध लेखिका तथा निवेदिका मंगला खाडिलकर यांनी वाहिली.
दिवंगत नेते स्व. मनोहर पर्रीकर यांच्या ''एक मनोहर कथा'' या पुस्तकाच्या लेखणीचा प्रवासही त्यांनी भाईंच्या आठवणींना उजाळा देत मांडला. बायणा रवींद्र भवनमध्ये स्व. मनोहर पर्रीकर यांची ७० वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला मंगला खाडिलकर प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी व्यासपीठावर नगरसेविका शमी साळकर, रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव, उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, रवींद्र भवनचे सदस्य तसेच स्व. मनोहर पर्रीकर यांचे चाहते उपस्थित होते.
यावेळी शमी साळकर यांनीही पर्रीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविकात पर्रीकर यांच्या कार्यपद्धतीवर विचार मांडून स्मृती जागविल्या. सूत्रसंचालन रवींद्र भवनचे सदस्य गौरीश नाईक यांनी केले तर उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई यांनी आभार मानले.
मंगला खाडिलकर यांनी पर्रीकर यांच्या विविध पैलूंवर विवेचन केले. गोव्यात विविध ठिकाणी कार्यक्रम करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जवळून ओळख झाली आणि त्यांच्यावर पुस्तक लिहिण्यासाठी धडपड सुरू झाली. २००६ पासून ते आजारपणापर्यंत त्यांच्यावर पुस्तक लिहिण्याची धडपड सुरूच होती. अखेर त्यांच्या निधनानंतर त्यांच्याच काही सहकाऱ्यांच्या सहकार्याने ''एक मनोहर कथा'' हे पुस्तक प्रकाशित करण्यात यश आले, असे खाडिलकर म्हणाल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.