baina robbery case  Dainik Gomantak
गोवा

Baina Dacoity: बायणा दरोड्याचा सूत्रधार भेळपुरीवाला! महाराष्ट्र, ओडिशातून 6 संशयितांना अटक

Baina dacoity mastermind: या प्रकरणात चामुंडा आर्केड इमारतीनजीक भेळपुरी, पाणीपुरीची हातगाडी लावणारा मुख्य सूत्रधार असल्याचे समजते

Akshata Chhatre

वास्को ता, २६ (प्रतिनिधी): बायणातील दरोड्याचा अवघ्या आठ दिवसांत मुरगाव पोलिसांनी इतर पोलिसांच्या सहकार्याने छडा लावला. या प्रकरणात चामुंडा आर्केड इमारतीनजीक भेळपुरी, पाणीपुरीची हातगाडी लावणारा मुख्य सूत्रधार असल्याचे समजते. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील मूळच्या ओडिशातील ६ संशयितांना महाराष्ट्र व ओडिशा राज्यातून अटक केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

पोलिसांनी कौतुक करावेसे वाटते

दरोड्याचा छडा लावल्याबद्दल दरोड्यातील पीडित सागर नायक यांनी आनंद व्यक्त केला. गोवा पोलिसांच्या कर्तबगारीवर आपला १०१ टक्के विश्वास होता , तथापि सदर प्रकरणाचा छडा लागण्यास सहा सात महिने लागतील, असे वाटत होते. मात्र एवढ्या लवकर छडा लावल्याबद्दल पोलिसांनी कौतुक करावेसे वाटते, असे दरोड्यातील पीडित सागर नायक म्हणालेत.

या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी मूळचे ओडिशाचे असलेल्या सहाजणांना बंगळुरू येथे अटक केली आहे. त्यांच्याकडून काही ऐवज जप्त करण्यात आला आहे. बेंगळुरू येथे सहा जणांना ताब्यात घेऊन लुटलेल्या ऐवजातील बराचसा ऐवज हस्तगत करण्यात आल्याची माहिती सागर नायक यांना मिळाल्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला.

याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. सावंत, पोलिस महासंचालक, महानिरीक्षक उपमहानिरीक्षक, दक्षिण गोव्याचे अधीक्षक, वास्कोचे उपअधीक्षक गुरुदास कदम, निरीक्षक वैभव नाईक, निरीक्षक जॅकीस शेरीफ व इतर पोलिसांचे आभार मानतो, असे सागर नायक यांनी सांगितले.

असा पडला होता दरोडा

बायणातील चामुंडा आर्केडच्या सहा मजल्यावर राहणारे सागर नायक यांच्या प्लॅटवर सात-आठ जणांनी दरोडा घातला होता. यावेळी त्यांनी सागर नायक यांच्या डोक्यावर लोखंडी कांबीने प्रहार करून रक्तबंचाळ केले होते.

सागर यांची पत्नी हर्षा, मुलगी नक्षत्रा यांनाही मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे हातापाय बांधून त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा घालून दरोडेखोर सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा मोठा ऐवज घेऊन पळाले होते. त्यांनी अगदी नियोजनबध्दरित्या हा दरोडा घातला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT