Goa Chhath Puja Dainik Gomantak
गोवा

बायणा किनाऱ्याचे रुपडे पालटणार; छठ पूजेवेळी CM नीं दिले आश्वासन

छठ पूजेसाठी बायणा किनाऱ्यावर 10,000 नागरिकांनी लावली उपस्थितीती;

दैनिक गोमन्तक

वास्को: उत्तर भारतातील नागरिकांनी बायणा समुद्रकिनाऱ्यावर पारंपारिक छठ पूजा उत्सव साजरा केला. यावेळी पारंपारिक कपडे घातलेल्या स्त्रिया फळांनी भरलेल्या टोपल्या आणि साहित्य घेऊन समुद्रकिनारी प्रार्थना करण्यासाठी सूर्यास्ताच्या आधी पोहोचल्या व ही पूजा उत्साहाने साजरी केली. यावेळी पर्यटनाला चालना देण्यासाठी बायणा समुद्रकिनाऱ्याच्या विकासाचे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उपस्थितांना दिले.

(Baina Beach 10000 citizens present with Chief Minister Pramod Sawant for Chhath Puja)

"वास्कोचे आमदार कृष्णा साळकर हे गेल्या पाच वर्षांपासून छठ पूजेचे आयोजन करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, बायणा समुद्रकिनाऱ्यालगतचा महामार्ग देखील एक आकर्षण आहे. कारण हा एकमेव किनारपट्टी महामार्ग आहे आणि बरेच लोक येथे येतात.

बायणा समुद्रकिनारा संपूर्णपणे पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून विकसित केला जाईल. छठ पूजेने विविधतेत एकता दर्शविली आहे, आम्ही आमदार कृष्णा साळकर आणि संकल्प आमोणकर आणि भाविकांना शुभेच्छा देतो असे सावंत म्हणाले.

वास्कोचे आमदार साळकर म्हणाले की, छठपूजेसाठी भाविकांची उपस्थिती दरवर्षी वाढत आहे."आमच्याकडे मुरगावमध्ये मोठ्या संख्येने उत्तर भारतीय आहेत जे छठ पूजा करतात, आणि आम्ही आता पाहिले आहे की, गोवावासीय देखील या पूजेमध्ये भाग घेत आहेत. या उत्सावात बायना बीचवर सुमारे 10,000 नागरिक उपस्थित आहेत असे साळकर म्हणाले.

या कार्यक्रमास वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, चिकलीचे सरपंच कमला प्रसाद यादव, मुरगावचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्स आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT