Court  Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: गांजाप्रकरणी अटकेतील दीपक रावतला जामीन

बेकायदेशीररित्या 8 किलो गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केलेल्या ओडिशा येथील दीपक रावत याला उत्तर गोवा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.

दैनिक गोमन्तक

Goa Drug case: बेकायदेशीररित्या 8 किलो गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केलेल्या ओडिशा येथील दीपक रावत याला उत्तर गोवा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. संशयित बिगर गोमंतकीय असल्याच्या कारणावरून जामीन नाकारता येत नाही. त्याच्याकडून जप्त केलेला गांजा 20 किलोपेक्षा कमी असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

त्यामुळे त्याला जामीन नाकारणे कायद्यानुसार योग्य नाही, असे निरीक्षण न्यायालयाने केले आहे. कळंगुट पोलिसांनी संशयित दीपक रावत याला कांदोळी येथे 14 जुलै 2023 रोजी संशयास्पद फिरताना ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली होती. त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या पिशवीत सुमारे 8 किलो गांजा सापडला होता. या गांजाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 8 लाख रुपये आहे. पोलिस कोठडीनंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

जामिनासाठी केलेल्या अर्जामध्ये संशयिताने त्याच्याविरुद्ध नोंद केलेला गुन्हा खोटा आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. तपासकामात सहकार्य करण्याची तयारी आहे, तसेच सुनावणीवेळी उपस्थित राहू त्यासाठी न्यायालयाने घातलेल्या अटी पाळल्या जातील, अशी बाजू मांडत जामीन देण्याची विनंती केली होती.

कळंगुट पोलिसांनी संशयिताच्या जामिनाला विरोध करताना तो बिगर गोमंतकीय असून त्याला जामीन मिळाल्यास तो खटल्यावरील सुनावणीला उपस्थित राहणार नाही, तसेच पुन्हा तो याच ड्रग्ज व्यवसायात सहभागी होईल. त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता.

जामिनासाठीच्या अटी अशा

संशयित दीपक रावत याने वैयक्तिक ५० हजाराची हमी व तत्सम रकमेचा एक हमीदार सादर करावा. त्याने न्यायालयात तसेच पोलिस बोलावतील, तेव्हा हजर राहावे. तपासकामात हस्तक्षेप तसेच साक्षीदारांना धमकावण्याचा प्रयत्न करू नये. न्यायालयाच्या किंवा तपास अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय त्याने गोव्याबाहेर जाऊ नये. त्याने निवासी पत्ता तसेच तो ज्या ठिकाणी काम करत असेल तेथील पत्ता ओळखपत्रासह सादर करावा अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT