Bail granted to mastermind of methar murder case after two years Dainik Gomantak 
गोवा

तोर्डा-पर्वरी जळीत हत्याकांडातील सूत्रधाराला दोन वर्षांनंतर जामीन

मेथर खूनप्रकरण; उत्तरेत प्रवेशबंदी, न्‍यायालयात उपस्‍थित राहण्‍यास मुभा

दैनिक गोमन्तक

पणजी : दोन वर्षापूर्वी तोर्डा-पर्वरी येथे घडलेल्‍या विलास मेथर जळीत हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार अल्ताफ यरगट्टी याला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. उत्तर गोव्यात त्याला प्रवेश नाकारताना फक्त सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहण्यास मुभा दिली आहे. घटनेनंतर दोन वर्षांनी त्याला जामीन मिळाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले असून त्यावरील सुनावणी सुरू झाली आहे. विलास मेथर खूनप्रकरणी पोलिसानी सातजणांविरोधात खून व कटकारस्थानच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले आहेत. संशयित अल्ताफ याने सत्र व उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी केलेले अर्ज फेटाळण्यात आले होते. तो या खूनप्रकरणातील प्रमुख सूत्रधार असल्याने त्याला या दोन्ही न्यायालयांनी (court) जामीन नाकारला होता.

पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात 71 साक्षीदार असून आरोपपत्र 508 पानांचे आहे. या प्रकरणाचा तपास पर्वरीचे तत्कालीन पोलिस (police) निरीक्षक निनाद देऊलकर यांनी केला होता.

संशयितांमध्ये अल्ताफ येरगट्टी, सय्‍यद शेख, पवन बडिगर, इक्बाल नानपुरी, संतोष पिल्लई, शैलेश शेट्टी व विश्‍वजीत दाबोळकर यांचा समावेश आहे. सहा संशयितांना जामीन मिळाला होता, मात्र अल्ताफ येरगट्टी याला तो मिळाला नव्हता. अल्ताफ यानेच विलास मेथर याच्याशी असलेल्या दुश्‍मनीमुळे त्‍याचा काटा काढण्यासाठी तिघा संशयितांना सुपारी दिली होती. त्यानुसार पूर्वनियोजन करून मेथर याला रस्त्यात अडवून बडिगर, नानपुरी व दाबोळकर या तिघांनी त्याच्या अंगावर जळीत द्रव्य टाकून जखमी केले होते व तेथून पळ काढला होता. विलासचा इस्पितळात उपचार सुरू असताना त्‍याचा मृत्यू (Death) झाला होता.

...म्‍हणून काढला होता काटा!

विलास मेथर ज्या साल्वादोर-द-मुंद येथील इमारतीत राहत होता, त्या इमारतीच्‍या छपरावर बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले होते. विलासने माहिती हक्क कायद्याखाली त्याबाबतची माहिती मिळवून पंचायत तसेच ‘रेरा’कडे त्‍याविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यात अल्ताफ येरगट्टी याचा उल्लेख केला होता. विलास मेथर हा या बेकायदेशीर कामामध्ये येरगट्टी याला अडथळा बनत होता. म्‍हणून त्‍याचा काटा काढण्‍याचा कट शिजला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT