उपद्रवी प्राण्यांनी बिघडवली आर्थिक घडी; सत्तरीत शेतकरी हतबल

नुकसान भरपाई हा पर्याय नव्हे
Nomadic animals spoil economic times satari farmers were helpless
Nomadic animals spoil economic times satari farmers were helplessDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई : सत्तरी तालुक्यात जंगली श्वापदांकडून होणारी प्रचंड नुकसानी शेतकरी, बागायतदारांच्या जीवावर बेतलेली आहे. बळीराजाला संरक्षण देण्याचे सोडून उपद्रवी प्राण्यांना मित्र बनविले जात आहे. यासाठी सरकारची उदासीनता कारणीभूत ठरत आहे. सत्तरीत गव्यांचा मुक्त संचार दिसून येतोय. नगरगाव पंचायत क्षेत्रात माळेली येथे गवा नजरेस पडला आहे. धावे गावातही बागायतीत, रस्त्यांवर ते फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे लोकांना बागायतीत जाणे धोक्याचे बनले आहे. वनखात्याने दुर्लक्ष केल्‍याने लोकांचे जगणे खडतर बनले आहे. सांगा आम्ही कसे जगायचे, असा प्रश्‍‍न लोक उपस्‍थित करू लागले आहेत.

सत्तरी (Satari) तालुका शेतीसंपदेने नटलेला असून भविष्यात ही शेती संस्‍कृती टिकणार काय, हा मोठा यक्षप्रश्न बनलेला आहे. कारण दिवसेंदिवस वन्यप्राणी शेती, बागायतीं फस्त करीत आहेत. जंगलातील अन्न नष्ट झाल्याने वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळविला आहे. सत्तरीत याआधी शेती, बागायती चांगली चालायची. वर्षाच्‍या अर्थकारणाची घडी बसलेली असायची. कधीतरी उत्पन्न कमी मिळत होते. पण तरीही सरासरी उत्पन्नात समतोल राखला जायचा. पण आजच्या घडीला आर्थिक घडी बदलेली आहे. जंगली प्राण्यांनी उत्पन्न फस्त करायचे व कष्टकरी लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घ्यायची असेच चित्र दिसते.

Nomadic animals spoil economic times satari farmers were helpless
मयेत जत्रेवरून वाद; प्रशासकीय प्रयत्न अयशस्वी

नारळाचे उत्‍पन्न कमालीचे घटले

सत्तरीत अनेकांच्या मोठमोठ्या बागायती आहेत. दरवर्षी पंचवीस-तीस हजार नग नारळाचे उत्पन्न घेणारे बागायतदार आता केवळ हजारही नारळ बघत नाहीत. कार्यक्रम, सण, उत्‍सवाला बाजारातून नारळ विकत आणत आहेत. एकेकाळी दर आठवड्याला केळीचे घड वाळपई, होंडा, साखळी, डिचोली अशा ठिकाणी पाजारपेठेत नेऊन व्यापार करीत होते. ते आता बंदच झाले आहे. पूर्वी अननसाचे पीक प्रत्येकाच्‍या कुळागरात खाण्यापुरते तरी मिळत होते. आता ‘एकेकाळी अननस फळ होते’ असे म्हणण्याची पाळी आली आहे.

नारळ (Coconut) पिकाला पाणी देणे, खते देणे ही कामे करावी लागतात. पण आता खेती, शेकरा या प्राण्यांनी नारळ पिकाला टार्गेट केले आहे. कोवळ्‍या नारळांचे जास्‍त नुकसान करीत आहेत. बागायतदारांनी या नुकसानीचा धसका घेतला आहे. वार्षिक मिळणारे उत्पन्न कमी झाल्याने कर्जफेड करणे कठीण होत आहे. या एकूण परिस्थितीमुळे शेतीचे व्यवस्थापनाचे वेळापत्रक बिघडले आहे. उपद्रवी प्राण्यांच्या सतावणुकीमुळे आताचा शेतकरी वर्ग नवीन प्रयोग करण्यास धाडस करीत नाही.

सुपारीचेही प्रचंड प्रमाणात नुकसान

शेती, (Agriculture) बागायती म्हटली की कष्ट करणे आलेच. सुपारी बागायतीत बाराही महिने काम करावे लागते. हिवाळ्यात पाणी पुरविणे, खते घालणे, चुडते गोळा करुन साफसफाई करणे आदी. पावसाळ्यात जमिनीवर पडलेली परिपक्व सुपारी रोज गोळा करणे, औषध फवारणी करणे ही कामे करावीत लागतात. त्यासाठी मनुष्यबळ हवे असते. त्यामुळे वर्षभर कामगार कुळागरात वावरत असतात. त्यांना मजुरी द्यावी लागते. सुपारी फळांची आजपर्यंत खेत्यांनी नुकसानी केली नव्हती. पण आता खेती उपद्रवी वन्यप्राणी सुपारी फळांच्या घोसावर बसून कच्ची सुपारी पाडत आहेत. तसेच सुपारीची वरची साल कुडतरून नुकसान करीत आहे.

नुकसान भरपाई हा पर्याय नव्हे

शेती, बागायतीची नुकसानी झाली की सरकारतर्फे नुकसान भरपाईची भाषा केली जाते. पण ही नुकसानी मिळतेच अशी नाही. आणि केवळ नुकसानीची भाषा योग्य पर्याय ठरणार नाही. कष्टकरी लोकांनी केलेल्या कष्ट मेहनतीचे काय, असा सवाल केला जात आहे. शेतकरी (Farmers) किंवा बागायतदार जमिनीतून धान्य उगवून पोटापाण्याची व्यवस्था करीत असतो.

त्याचे योग्य फळ त्‍याला मिळाले पाहिजे. पण उपद्रवी प्राण्यांमुळे होणारे नुकसान बघवत नाही. कुळागरात राशीच्या राशी नारळाच्‍या पडलेल्या दिसतात. त्याची नुकसान भरपाई का दिली जात नाही, असा सवालही केला जात आहे. वन्यप्राण्यांना जंगलात रोखणे हा त्‍यावर पर्याय आहे. त्याची नैतिक जबाबदारी वन खात्याची आहे. पण वन खाते याबाबत कोणतेही उपाययोजना करीत नाही. केवळ जंगलात कॅमेरे बसविले म्हणजे काम होत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com