Crime News  Dainik Gomantak
गोवा

Crime News : नगरसेवकांना मारहाण करणाऱ्यास जामीन मंजूर

Crime News : त्याला रविवार, ९ जूनपासून पोलिस स्थानकात ८ दिवस हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News :

पणजी, महापालिकेचे नगरसेवक तसेच महापालिका मार्केट समितीचे सदस्य संतोष ऊर्फ बन्सी सुर्लीकर यांना शुक्रवारी (ता.७) पणजी मार्केटमध्ये मारहाण केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी अटक केलेल्या फळविक्रेत्या संशयित मोईन रशीद नारंगी (रा. करंजाळे, तिसवाडी) याला न्यायालयाने शनिवारी (ता.८) सशर्त जामीन दिला.

त्याला रविवार, ९ जूनपासून पोलिस स्थानकात ८ दिवस हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली आहे.

पणजी मार्केटमधील बेकायदा व्यवसाय बंद करण्यासह कलिंगड जप्त केल्याच्या रागातून ही मारहाणीची घटना शुक्रवारी रात्री ८ वा.च्या सुमारास पणजी मार्केटात घडली. नेहमीप्रमाणे नगरसेवक संतोष सुर्लीकर हे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह बाजारात फेरफटका मारत होते. यावेळी संशयित मोईन नारंगी याने त्यांच्याशी वाद घातला आणि त्यांचा हात पकडून धक्काबुक्की करत मारहाण केली व गंभीर परिणाम भोगण्यास तयार राहण्याची धमकी दिली.

यापूर्वी तक्रारदार सुर्लीकर यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संशयिताचा मार्केटमधील बेकायदेशीर व्यवसाय थांबवला होता. शिवाय त्याच्या कलिंगडांसह अन्य मालही जप्त केला होता. त्याचाच वचपा संशयिताने नगरसेवकांना मारहाण करून काढला.

पणजी पोलिसांनी भा.दं.सं.च्या ३५३, ३२३ व ५०६ (२) कलमांतर्गत गुन्हा नोंदवून संशयित मोईन याला शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. संशयित मोईन नारंगी याने शनिवारी पणजी प्रथम श्रेणी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असता न्यायालयाने त्याची १० हजार रुपयांच्या वैयक्तिक जाचमुचलक्यावर सुटका केली तसेच ८ दिवस दररोज पोलिस स्थानकात हजेरी लावण्याची अट घातली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT