Goa Flood: पुरामुळे घरात अडकलेल्या 9 जणांची सुखरुप सुटका, तीन बालकांचा समावेश; बागवाडा शाळेत स्थलांतर
गोवा

Goa Flood: पुरामुळे घरात अडकलेल्या 9 जणांची सुखरुप सुटका, तीन बालकांचा समावेश; बागवाडा शाळेत स्थलांतर

पिळगाव पंचायत क्षेत्रातील बागवाडा भागात पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने एका बालकांसह नऊजण घरात अडकून पडले. यात महिलांचाही समावेश होता.

Manish Jadhav

पिळगाव पंचायत क्षेत्रातील बागवाडा भागात पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने एका बालकांसह नऊजण घरात अडकून पडले. यात महिलांचाही समावेश होता. डिचोली अग्निशमन दलाने अडकून पडलेल्या नऊ जणांची सुखरुप सुटका केली. या नऊही जणांचे बागवाडा येथील सरकारी शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे.

दरम्यान, गुरुवारी दुपारी अचानक बागवाडा येथील नदीतील पाण्याने पातळी ओलांडल्याने येथील चार-पाच घरांना पुराच्या पाण्याने वेढा दिला. त्यामुळे घरात असलेल्या महिलांवर आकांत कोसळला. यात तीन बालकांचाही समावेश होता. अग्निशमन दलाला माहिती मिळताच जवानांनी मोटरबोटसह येथे दाखल झाले. अधिकारी राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी नऊजणांची सुखरुप सुटका केली.

पुरामुळे घरात अडकलेल्या काजूमळ-कारापूर येथील एका महिलेची सुखरुप सुटका करण्यात आली. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी परिस्थितीची पाहणी केली.

तीन मुलांसह महिलांचाही समावेश

बागवाडा येथील पुरात अडकलेल्या नऊजणांची सुटका करण्यात आली. यात ज्योती नाईक (60), लीलावती साळगावकर (65), अंकुश पेडणेकर (72), प्रगती पेडणेकर (42), संजना पेडणेकर (40), नीता पेडणेकर (30), साईज्ञा पेडणेकर (5), समर्थ पेडणेकर (5) आणि श्रीराज पेडणेकर (2) यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT