Baga Hadfade Night Club  Canva
गोवा

Baga: परप्रांतीय दलालांची वाढती मनमानी धोकादायक! बेकायदेशीर नाईट क्लब्जवर कारवाई करा; हडफडे सरपंचांची मागणी

Baga Hadfade Night Club: बागा - हडफडे परिसरात बेकायदा नाईट क्लब कार्यरत असल्यामुळे त्या क्लबशी संबंधित दलालांची परिसरात मनमानी सुरू आहे.

Sameer Panditrao

कळंगुट: बागा - हडफडे परिसरात बेकायदा नाईट क्लब कार्यरत असल्यामुळे त्या क्लबशी संबंधित दलालांची परिसरात मनमानी सुरू आहे. गोवन नाईट क्लब नावाने कार्यरत असलेल्या येथील क्लबमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली जात असल्याने हणजुण पोलिस तसेच पर्यटन खात्याकडून त्या क्लबवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागवा - हडफडे पंचायतीचे सरपंच रोशन रेडकर यांनी केली आहे.

ॲरनेस्टीना परेरा या महिलेकडून चालवण्यात येत असलेला येथील गोवन नाईट क्लब पूर्णपणे बेकायदा असून परेरा यांच्यापाशी संबंधित नाईट क्लब संबंधात कुठल्याही प्रकारची कायदेशीर कागदपत्रे नसल्याचे सरपंच रोशन रेडकर यांनी सांगितले.

दरम्यान, क्लबशी संबंधित परप्रांतीय दलालांच्या मनमानी वृत्तीमुळे परिसरातील महिला व मुलींच्या जीविताला धोका निर्माण होऊन बसल्याने हणजुण पोलिसांनी याबाबतीत तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी सरपंच रोशन रेडकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT