Goa Salcete Fishermens  Dainik Gomantak
गोवा

खवळलेल्या दर्याचा मच्छीमारांना फटका, मासेमारी करण्याचे टाळले

Goa Fishing: हवामान खराब तसेच दर्या खवळलेला असल्‍याने मच्छीमारांनी सुरक्षेच्या कारणास्तव मासेमारी करण्याचे टाळले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

फातोर्डा: मासेमारी बंदी आजपासून उठविली असली, तरी दर्या खवळल्याने सासष्टीतील मच्छीमारांनी समुद्रात उतरण्याचे टाळले आहे.

मागील एक महिन्यापासून त्यांच्या बोटी किनाऱ्यावर होत्या. या काळात मासेमारीसाठी सरकारने बंदी घातली होती. मागील १० दिवसांपासून या मच्छीमारांनी दर्यात मासेमारीसाठी जाण्‍याची तयारीही केली होती.

मात्र, हवामान खराब तसेच दर्या खवळलेला असल्‍याने मच्छीमारांनी सुरक्षेच्या कारणास्तव मासेमारी करण्याचे टाळले आहे.

सध्या दर्याही खवळलेला आहे. सध्याची स्थिती समुद्रात उतरण्यासाठी योग्य नाही. त्यातच वेगाने वारे वाहात आहेत. दर्या शांत झाल्यानंतर मासेमारीसाठी समुद्रात उतरणार आहोत, असे बाणावली येथील मच्छीमार पेले फर्नांडिस यांनी सांगितले.

कोलवा येथील मिनिनो यांनी सांगितले, बोटीवर काम करणारे कामगार गावी गेले आहेत. ते सध्या पावसामुळे तेथेच अडकून पडले आहेत. त्यामुळे बोट समुद्रात उतरविण्याचे टाळले आहे. कामगार आल्‍यानंतर बोट समुद्रात उतरवणार आहोत, असे अन्य बोटमालकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tillari Dam: 'तिळारी'च्या कमांड क्षेत्रातून मोठा भूभाग वगळण्याचा प्रस्ताव गोव्यासाठी घातक, कॅसिनोसाठी धोकादायक पायंडा नको

Goa Live News: कलंगुटमध्ये निर्माणाधीन हॉटेलला भीषण आग

Carambolim Mega Project: करमळीतील ‘तो’ प्रकल्‍प थांबवणार! मुख्‍यमंत्र्यांचे आश्‍‍वासन; काम थांबवण्‍याचा आदेश होणार जारी

Bhagut Utsav Goa: घनदाट जंगल, अंधारी गुहा; गोळावलीतील सिद्धेश्वराचा ‘भगुत उत्सव’; 300 वर्षांची परंपरा उत्साहात; शेकडो भाविकांची उपस्थिती

Goa Lokayukta: गोव्यातील लोकायुक्त निवड आणखी लांबली! 16 जानेवारीनंतर बैठक होण्याची शक्यता; सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT