Mapusa Roads Dainik Gomantak
गोवा

Mapusa Roads: नेहमीचीच रड! कोट्यवधी खर्चून डांबरीकरण केले, ते पावसात गेले वाहून; चतुर्थी उलटून गेली तरी म्हापशातील रस्ते 'जैसे थे'

Goa Roads: तसेच या पावसामुळे ठिकाणी सर्वत्र चिखल माती आणि संपूर्ण वाहून गेलेला रस्त्यामुळे मधोमध पावसाचे पाणी साचून राहिलेले आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

Sameer Panditrao

बार्देश: भूमिगत केबलिंग अंतर्गत म्हापसा मतदारसंघातील सर्व रस्त्यांचे खोदकाम करून केबल घालण्याचे काम सुरू होते. परंतु ते काम अर्धवट राहिले व फोडलेले रस्ते तसेच ठेवल्याने व डांबरीकरण न झाल्याने या रस्त्यांची पावसामुळे दुर्दशा झालेली आहे.

तसेच या पावसामुळे ठिकाणी सर्वत्र चिखल माती आणि संपूर्ण वाहून गेलेला रस्त्यामुळे मधोमध पावसाचे पाणी साचून राहिलेले आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करणार म्हणून पावसाळ्यापूर्वी आश्वासन दिले होते. पण त्या अगोदर रस्त्यावर पडलेले खड्डे चतुर्थीपूर्वी बुजविण्यात येतील, असे सांगितले होते. पण चतुर्थी उलटून गेल्यावरही रस्ते जसेच्या तसे आहेत.

त्यामुळे म्हापसा मतदारसंघातील रस्ते आणि मुख्यतः म्हापसा पालिका बाजारपेठेतील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून त्यात धो धो पडत असलेल्या पावसाचे पाणी साचून राहिल्याने पाण्याच्या तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. चतुर्थीच्या काळात विक्रेत्यांना त्या पाण्यातच बसून माल विकावा लागला. त्यामुळे या विक्रेत्यांनी म्हापसा पालिका आणि आमदारांबद्दल नाराजी वक्त केली.

दरम्यान आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत म्हापसा कार्व्हालो पेट्रोल पंप ते बोडगेश्वर मंदिरपर्यंतच्या रस्त्याचे कोट्यवधी रुपये खर्चून डांबरीकरण केले होते. ते यंदाच्या पहिल्याच पावसात वाहून गेले.

म्हापशाला नवीन आमदाराची गरज !

म्हापसा मतदारसंघ हा गेल्या कित्येक वर्षांपासून सोयीसुविधांपासून वंचित राहिलेला आहे. या मतदारसंघाचे तत्कालीन आमदार माजी उपमुख्यमंत्री स्व. फ्रान्सिस डिसोझा यांनी सरकारमध्ये सर्व खाती सांभाळली पण म्हापशाच्या विकासासाठी मात्र काहीही केले नाही, अशी प्रतिक्रिया गोवा शिवसेना प्रमुख जितेश कामत यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar: 'रामाच्या 'बोलवत्या धन्या'ला शोधा', खासदार तानावडेंचा रोखठोक पवित्रा; म्हणतायत, "हे आरोप निराधार"

Shubman Gill Catch: फलंदाजीत शतक, फिल्डिंगमध्ये 'सुपरमॅन'; हवेत उडी घेत गिलने टिपला अविश्वसनीय झेल, VIDEO पाहून व्हाल थक्क

गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेला सलाम! काही तासांतच शोधून दिलं बेळगावच्या महिलेचं 4.5 लाखाचं 'मंगळसूत्र', बागा येथील घटना

World Cup Prediction: 'मी 2026 च्या विश्वचषकात खेळेन...' अनकॅप्ड खेळाडूचा दावा कशाच्या आधारावर? प्रीती झिंटाचा आवडता खेळाडू चर्चेत

Filmfare Award: बॉलीवूडमध्ये गोव्याचा डंका! 'Article 370' साठी आदित्य जांभळे यांना फिल्मफेअर पुरस्कार

SCROLL FOR NEXT