Goa Road Issue: Dainik Gomantak
गोवा

Goa Road Issue: खड्ड्यांतून शोधावा लागतो माेरजीवासीयांना रस्ता

Goa Road Issue: दुरवस्था : स्थानिकांसह पर्यटकांचेही मोडतेय कंबरडे

दैनिक गोमन्तक

Goa Road Issue: मोरजी पंचायत क्षेत्रातील मरडीवाडा येथील मुख्य रस्ता वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. येथील असंख्य खड्ड्यांमधून रस्ता कुठे आहे, हे वाहनचालकांना शोधावे लागते. रस्ता शोधत असतानाच काही वाहनचालक या खड्ड्यांमध्ये पडतात.

रात्री-अपरात्री पर्यटकही या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने पडतात. या रस्त्याची डागडुजी कधी करणार, असा प्रश्‍न मोरजीवासी विचारत आहेत.

या रस्त्याची यापूर्वी दोन-तीन वेळा दुरुस्ती झाली. मात्र, सतत पडणाऱ्या पावसामुळे छोटे असलेल्या खड्ड्यांचा आता आकार विस्तारला आहे. खड्डे बुजवताना पाऊस थोडा कमी झाला. परंतु रस्त्याचे काम केल्यानंतर पुन्हा जोरदार पाऊस आला आणि सर्व रस्ते वाहून गेले.

पंचायतीनेही पुढाकार घेऊन हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पावसापुढे कुणाचेही शहाणपण चालेना.

आता या रस्त्यांबाबत सार्वजनिक बांधकाम खाते तरी काही करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या रस्त्यावरून प्रचंड त्रास असून या समस्येबाबत वारंवार तक्रार करण्यात आली आहे. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली अाहे.

रस्त्याची उंची वाढविण्याची मागणी

रहिवासी संदेश शेटगावकर म्हणाले की, या रस्त्याची उंची वाढवण्याची गरज आहे. ज्यावेळी या रस्त्यावर खड्डे पडले, त्यावेळी केवळ दगड घालून ते बुजवण्याचा प्रयत्न केला. परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे खड्ड्यांचा आकार मोठा झाला आहे.

या रस्त्याच्या बाजूला गटार व्यवस्था नाही. या खड्ड्यांमुळे अनेकवेळा अपघात घडले आहेत. रात्री-अपरात्री पर्यटकही या खड्ड्यांमध्ये पडतात. त्यामुळे आम्हाला त्यांच्या मदतीला धावून जावे लागते.

गटारे गायब, पाणी रस्त्यांवर : मरडीवाडा-मोरजी येथे रस्त्यावर खड्डे पडण्यास आणखी एक कारण आहे. या रस्त्याच्या बाजूला गटार व्यवस्था नसल्यामुळे संपूर्ण पाणी रस्त्यावर साचते. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानंतर त्यांचा आकार मोठा होतो. अशा खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. ते त्यामुळे बऱ्याचदा या मार्गावरील वाहतूक मंदावते. अनेकजण खड्डे चुकवण्यासाठी जीवघेणी कसरत करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant: कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्यावरुन संतापले गोव्याचे मुख्यमंत्री; शांतता आणि एकतेवर हल्ला असल्याची टीका

Panaji: अजगराला फरफटत नेणे, ओढून त्रास देणे भोवले; वन विभागाने घेतली दखल, गुन्हा नोंद

Cuchelim Comunidad: 140 बांधकामांवर फिरणार बुलडोझर! कुचेली कोमुनिदाद जागेत अतिक्रमण; उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

गोव्यातील बेकायदेशीर घरांना वीज आणि पाणी कनेक्शन मिळणार नाही: मुख्यमंत्री सावंत असं का म्हणाले?

Goa Opinion: कुछ भी करो, चलता है! गोव्याला जबाबदार पर्यटक अन् कठोर नियमांची गरज

SCROLL FOR NEXT