Chorla Ghat
Chorla Ghat Dainik Gomantak
गोवा

चोर्ला महामार्गाची अवस्था जैसे थे!

दैनिक गोमन्तक

वाळपई: गोवा आणि कर्नाटकमधील चोर्ला भागातील रस्ता दोन राज्यांच्या सीमेजवळ अपघात प्रवण बनला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण कड्याची दुर्दशा झाली असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या धोकादायक स्थितीकडे राष्ट्रीय महामार्ग यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्यालगतच्या कड्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. (Bad condition of Chorla highway)

चोर्ला मार्गे (Chorla Ghat) जाणारा महामार्ग हा गोवा आणि कर्नाटकला जोडणारा सर्वात लहान मार्ग आहे. या महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. विशेषत: बेळगाव भागात जाणाऱ्या वाहनांना या रस्त्याचा मोठा फायदा होत असून लग्नाच्या खरेदीसाठी तसेच इतर बाजारपेठांमध्ये मोठ्या संख्येने गोवावासीय बेळगावला जातात.

गेल्या वर्षी गोवा सरकारने (Goa Government) रस्त्याचे डांबरीकरण सुरू केले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून या रस्त्याचे डांबरीकरण सुरू झाले असले तरी अद्याप या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झालेले नाही. केरी जांभळी जंक्शन परिसरातील रस्त्याचे हॉटमिक्सिंगचे काम अद्यापही अपूर्ण आहे. केरी ते गोवा हद्दीपर्यंतच्या या रस्त्याच्या देखभालीकडे सातत्याने लक्ष देण्याची गरज असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे बेळगाव (Belgaum) परिसरातून गोव्यात येणाऱ्या वाहनांना मोठा धोका निर्माण झाला आहे. वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यास वाहन खोल दरीत कोसळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात पावसाळ्यात सलग तीन रस्त्यांवर दरड कोसळल्या आहेत. हे लक्षात घेऊन महामार्ग अधिकाऱ्यांनी किमान यंदा तरी उपाययोजना करणे गरजेचे होते. मात्र, महामार्गाच्या दुरूस्तीसाठी अद्याप उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

SCROLL FOR NEXT