Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate: बाबूश बलात्‍कारप्रकरणी सुनावणी 7 पर्यंत तहकूब

Babush Monserrate: बलात्‍कार प्रकरणातील सुनावणी बुधवारी दोन्‍ही संशयित न्‍यायालयात उपस्‍थित नसल्‍याने 7 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्‍यात आली.

दैनिक गोमन्तक

Babush Monserrate: महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात यांचा कथित सहभाग असलेल्‍या २०१६ सालच्‍या अल्‍पवयीन मुलीवरील बलात्‍कार प्रकरणातील सुनावणी बुधवारी दोन्‍ही संशयित न्‍यायालयात उपस्‍थित नसल्‍याने 7 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्‍यात आली.

या प्रकरणात बाबूश माोन्सेरात यांच्‍याबरोबर त्‍या अल्‍पवयीन मुलीला मोन्‍सेरात यांना विकल्‍याचा आराेप असलेली मुलीची आईही संशयित आहे. राजकारण्‍यांविरोधातील खटले हाताळणारे खास न्‍यायाधीश न्‍या.इर्शाद आगा यांच्‍यासमोर ही सुनावणी चालू आहे. 2016 साली बाबूश मोन्‍सेरात यांनी त्‍या अल्‍पवयीन मुलीला तिच्‍या आईकडून 50 लाख रुपये देऊन विकत घेतले आणि नंतर तिला गुंगीचे औषध पाजून तिच्‍यावर बलात्‍कार केल्‍याचा आरोप ठेवण्‍यात आला आहे.

2016 साली मे महिन्‍यात पणजी महिला पोलीस स्‍थानकात हे प्रकरण नोंद झाले होते. आमदार असलेले मोन्‍सेरात यांनी एका अल्‍पवयीन मुलीला तिच्‍या आईकडून 50 लाख रुपयाला विकत घेतले आणि नंतर गुंगीचे औषध पाजून तिच्‍यावर बलात्‍कार केला, असा आरोप त्‍यांच्‍यावर ठेवण्‍यात आला आहे. त्‍या मुलीची आई या प्रकरणात सहयोगी आरोपी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT