पणजी : पणजीतील पोलीस स्थानकावरील हल्लाप्रकरणी आमदार बाबूश मोन्सेरात आणि पत्नी मंत्री जेनिफर मोन्सेरात यांना सोमवारी न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. मोन्सेरात दाम्पत्यासह इतरांविरोधात म्हापशातील विशेष न्यायालयाने आरोप निश्चित केले होते. आता या तोडफोड प्रकरणाची आज 3 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
पणजीतील पोलीस स्थानकावर 19 फेब्रुवारी 2008 रोजी हल्ला झाला होता. या हल्ला प्रकरणी भाजप आमदार अनातासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात, (Babush Monserratte) त्यांच्या पत्नी जेनिफर यांच्यासह 37 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. आमदार बाबूश यांना त्यावेळी अटकही कऱण्यात आली होती.
सीबीआयने म्हापसा (Mapusa) येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाद मागत घेऊन खटला रद्द करण्याची मागणीही झाली होती. गोवा खंडपीठाने 24 एप्रिल 2014 रोजी ही मागणी फेटाळून खटला रद्द करण्यास नकार दिला.
आमदार बाबूश आणि साथीदारांविरुद्ध न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले होते. मात्र त्याला मंत्री जेनिफर मोन्सेरात, पणजीचे तत्कालीन महापौर टोनी रॉड्रिग्ज व इतर 27 संशयितांनी खंडपीठात (Court) आव्हान दिले होते. मात्र खंडपीठाने 4 डिसेंबर 2014 रोजी खटला स्थगितीचा आदेश जारी केला होता. अॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी खंडपीठाला पत्र याचिका करून सुनावणी जलद घेण्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार न्या. मनीष पितळे यांनी खंडपीठाने दिलेली स्थगिती उठवून जलद सुनावणीचे निर्देश दिले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.