पणजी: राज्यात कोणत्याही स्थितीत पुन्हा भाजप सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने प्रचारामध्ये व मतदारांचा मोठा पाठिंबा असलेल्या इतर पक्षातील उमेदवारांना आपल्याकडे ओढण्याचा सपाटाच लावला आहे. त्यात ते यशस्वीही होत आहेत.
पेडण्यात (Pernem) मगोच्या यादीतील उमेदवार प्रवीण आर्लेकर (Pravin Arlekar) हे भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने विद्यमान आमदार तथा मंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता अंधूक झाली आहे. त्यामुळे त्यांनी मगोत प्रवेश मिळवण्यासाठी स्थानिक मगो कार्यकर्त्यांना हाताशी धरले असले तरी राजन कोरगावकर यांना मगो पक्षाकडून संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपमध्ये (BJP) प्रवेश करून विद्यमान सरकार स्थिर ठेवण्यासाठी भूमिका बजावली आहे. पक्षाने इतर कोणालाही प्रवेश दिला तरी आगामी निवडणुकीत पेडण्यातून भाजपची उमेदवारीसाठी पक्ष माझ्याच नावाचा विचार करील व पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने ती मलाच मिळेल, असा दावा करणारे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) हे आता दडपणाखाली आले आहेत. मगोचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांनी मगो (MGP) सदस्यत्व नोंदणी रद्द केली आहे. ते उद्या 3 रोजी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आजगावकर यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. गेले कित्येक दिवस भाजपवर विश्वास असल्याचे सांगणाऱ्या आजगावकरांनी पेडणे मतदारसंघातील मगो कार्यकर्ते व नेत्यांशी सलगी साधली आहे.
आता मगोच्या भूमिकेकडे लक्ष
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्या सरकारमध्ये मगोचे तीन आमदार होते. त्यापैकी बाबू आजगावकर आणि दीपक पाऊसकर यांनी मगोला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मगोने या घटनेनंतर फुटिरांना पुन्हा पक्षात न घेण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय कायम ठेवणार का? याकडे मगो कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.