Babush Monserrate |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate ठरविणार पणजी भाजप अध्यक्ष; मर्जीतील माणूस

संजीव देसाईंचे पारडे जड; शांताराम नाईक पडले मागे

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी भाजप मंडळ अध्यक्षपदावरून नगरसेवक शुभम चोडणकर हे पायउतार झाल्‍यासारखेच आहे. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे तशी इच्‍छा यापूर्वीच व्यक्त केली होती. त्यामुळे आता या पदावर आपल्या मर्जीतील माणूस असावा म्हणून मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी संजीव देसाई यांचे नाव पुढे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संजीव देसाई हे मोन्सेरात यांचे समर्थक मानले जातात. भाजप केडरने विधानसभा निवडणुकीवेळी काम न केल्याने कमी मतांनी निवडून आल्याची सल अद्याप मंत्री मोन्सेरात यांना टोचत आहे. त्यामुळे आपल्या विश्‍वासातील माणूस या मंडळावर असावा म्हणून त्यांनी भाजप समितीला संजीव देसाई यांचे नाव सुचविले आहे. सध्या देसाई यांचे नाव चर्चेत आहे.

यापूर्वी शांताराम नाईक यांना ही संधी मिळणार असल्याचे बोलले जात होते. परंतु नाईक हे भाजपचे कट्टर समर्थक मानले जातात. शिवाय त्यांचे पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे हे पद देणे जोखमीचे ठरू शकते म्हणून कदाचित मोन्सेरात यांनी आपल्या मर्जीतील व्यक्ती या पदावर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला गेल्याची चर्चा आहे.

म्‍हणून बाबूशना पाहिजे आपला माणूस

पणजीत विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांनी उमेदवार म्हणून आपले काम न करता अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांच्‍यासाठी पडद्यामागून काम केले होते, हे निकालानंतर स्पष्ट झाले.

त्यामुळे पणजी भाजप मंडळाविषयी बाबूश यांना फारशी आत्मीयता कदाचित नसावी. त्यामुळेच पणजीत भाजप मंडळावर आपल्या मर्जीतील माणूस राहिल्यास आपल्यालाही फायदेशीर ठरणार असल्याचे जाणूनच मोन्सेरात यांनी हा डाव खेळला असावा, असे भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT