Babush Monserrate in Goa Assembly Session  Dainik Gomantak
गोवा

बांधकाम नियमितीकरणाचे 90 टक्के अर्ज निर्णयाविना

7,552 अर्ज; सर्वाधिक प्रमाण बार्देश, सासष्टीमध्ये असल्याची बाबूश मोन्सेरात यांची विधानसभेत माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात विविध तालुक्यांतील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात खासगी जमिनीतील बांधकाम नियमितीकरणासाठी 7,552 अर्ज दाखल झाले असले तरी विविध कारणांसाठी त्यातील 95 टक्क्यांहून अधिक अर्ज प्रलंबित आहेत. 5 टक्के अर्ज निकालात काढले आहेत. त्यातील अर्ध्याहून अधिक अर्ज कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नसल्याने फेटाळले आहेत.

सर्वाधिक अर्ज बार्देश आणि सासष्टी तालुक्यातील आहेत. काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी राज्यातील खासगी जमिनीतील बांधकाम नियमितीकरणाच्या अर्जांची माहिती विधानसभेत मागितली होती. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिलेल्या उत्तरात उपजिल्हाधिकाऱ्यांकडे आलेल्या अर्जांची तपासणी करून त्यासोबत आवश्‍यक असलेल्या दस्तावेजावरच सुनावणी घेतली जाते. ज्यांनी दस्तावेज जोडले नाहीत, त्यांना पत्र पाठवून त्याची पूर्तता करण्यास सांगण्यात येते. बहुतेक अर्ज हे आवश्‍यक ते दस्तावेज सादर न केल्याने सुनावणीविना प्रलंबित आहेत. हे अर्ज निकालात काढण्यासाठी कायद्यात वेळमर्यादा नमूद केलेली नाही, असेही दिसून आले आहे.

अनेकांनी खासगी जमिनीत परवाने न घेताच कोमुनिदाद, खाजन, शेतजमिनीत बांधकामे केल्यानंतर ती नियमितीकरणासाठी अर्ज केले आहेत. ही बांधकामे कायद्याच्या चौकटीत बसत नसल्यास ती फेटाळण्यात येतात. अनेकांनी केलेल्या अर्जासोबत आवश्‍यक ते दस्तावेज सादर करण्यास सांगूनही दिले नसल्याने ते निर्णयाविना प्रलंबित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT